शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ मार्गावर कंत्राटदाराने पसरविली गिट्टी

By admin | Updated: June 27, 2017 00:32 IST

गणेशपूर ते कोरंभी या मार्गाला जोडणाऱ्या मार्गावर वैनगंगा नदीपात्रात पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना सुविधा व्हावी ....

प्रकरण गणेशपूर - कोरंभी मार्गाचे : जया सोनकुसरे यांनी दिले होते अल्टीमेटमलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गणेशपूर ते कोरंभी या मार्गाला जोडणाऱ्या मार्गावर वैनगंगा नदीपात्रात पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना सुविधा व्हावी याकरिता पर्यायी रस्ता कंत्राटदाराने बनवावे असे अंदाजपत्रकात नमूद आहे. मात्र कंत्राटदाराने रस्त्याकरिता केवळ माती टाकली होती. पाऊस पडल्याने हा रस्ता रहदारीयोग्य न झाल्याने वाहनधारक येथून जाताना पडल्याने जखमी झाले होते. याबाबत शिवसेनेने दिलेल्या २४ तासाच्या अल्टीमेटम नंतर या मार्गावर गिट्टी पसरविण्यात आली.गणेशपूर येथून पिंडकेपार - कोरंभी, सालेबर्डी, खैरी, कवडसी, सावली, पिपरी यासह पुढील गावांना जाण्याचा हा मुख्य मार्ग आहे. वैनगंगा नदीपात्रात जुना पुल आहे. मात्र त्याची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग अनेकदा बंद राहतो. त्यासह गोसेखुर्द धरणाच्या जलसंचयामुळेही येथून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होता. ही बाब लक्षात घेऊन गोसेखुर्द पुनर्वसन प्रकल्प कार्यालयाने या मार्गावर सुमारे तीन कोटी रुपयांचा पुल मंजूर केला व त्याचे काम सध्या सुरु आहे.१८ महिने लोटूनही पुलाचे काम सुरुच असल्याने या प्रकारात संथगती सुरु असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी लावला होता. दरम्यान हा मुद्दा त्यांनी जिल्हा परिषद सभागृहातही उपस्थित केला होता. वेळेत पुलाचे काम होणे गरजेचे असताना उन्हाळ्यात काम न करता आता पावसाळ्याच्या तोंडावर पुलाचे काम व रस्त्याचे काम पूर्ववत सुरु केलेले आहे. दरम्यान कंत्राटदाराने येथून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना सुविधा व्हावी यासाठी पर्यायी रस्ता तयार करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी थातूरमातूर काम करताना माती टाकली. दरम्यान पावसामुळे माती ओली झाली व येथून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारक, सायकलचालक व पादचाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. अनेकजण येथून जाताना पडल्याने जखमी झाले. ही बाब उचलून जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी सदर कंत्राटदाराला नागरिकांना चांगल्या रस्त्याची सुविधा देण्याची मागणी केली. २४ तासात ती पूर्ण न केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. जया सोनकुसरे यांनी दिलेल्या इशाऱ्याची कंत्राटदार व संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दाखल घेतली. त्यांनी या पर्यायी रस्त्यावर टाकलेल्या मातीवर ताबडतोब गिट्टी पसरविली असून नागरिकांसाठी आता सुविधायुक्त रस्ता झालेला आहे. यावरून कंत्राटदाराचा मनमानी कारभार दिसून आला.