शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लक्षावधी खर्चूनही नाल्यांत कचरा तुंबलेलाच

By admin | Updated: July 21, 2015 00:38 IST

दिवसेंगणीक भंडारा शहराची व्याप्ती वाढत असताना स्वच्छतेच्या मुद्यावर मात्र भंडारा नगरपालिका प्रशासन सपेशल फेल ठरली

नाल्या झाल्या चोक : डासांमुळे नागरिक झाले त्रस्तभंडारा : दिवसेंगणीक भंडारा शहराची व्याप्ती वाढत असताना स्वच्छतेच्या मुद्यावर मात्र भंडारा नगरपालिका प्रशासन सपेशल फेल ठरली आहे. विशेष म्हणजे स्वच्छते बाबतीत जेवढी जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे तेवढीच जबाबदारी नागरिकांची आहे. या दोघांचा बेजबाबदारपणामुळे भंडारा शहराचा चेहरामोहरा घाणयुक्त बनला आहे.पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी पालिका प्रशासनाकरवी लाखो रुपयांचा खर्च करून शहरात स्वच्छता मोहीम राबविली जाते. परंतु लक्षावधी रुपयांचा खर्च होऊनही स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. यावर्षीही नगरपालिका प्रशासनाच्या स्वच्छता विभागातर्फे मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात २५ पेक्षा जास्त स्वच्छता कर्मचारी व जेसीबीच्या सहाय्याने कचऱ्याची उचल करण्यात आली. तुंबलेल्या नाल्यांमधील कचरा उपसण्यात आल्याचेही पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. असे नाही की, नाल्यांमधील गाळ उपसण्यात आला नाही. मात्र सर्वच ठिकाणी शंभर टक्के काम झालेले नाही. जवळपास १० लाखांपेक्षा निधी स्वच्छता मोहीमेवर खर्च झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही वॉर्डामध्ये स्वच्छतेचे काम आजही सुरुच आहे. दरवर्षी लक्षावधी रुपयांचा खर्च करून शहराचा चेहरामोहरा बदलण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरत असेल तर येवढा निधी खर्चून उपयोग काय? असा खरा सवाल सर्वांसमोर उपस्थित होतो. (प्रतिनिधी)पावसाळ्याच्या तोंडावर सफाई कर्मचारी व जेसीबीच्या सहाय्याने नाल्यांमधील गाळ उपसण्यात आला आाहे. ज्या ठिकाणी जास्त गरज आहे त्या भागावर लक्ष केंद्रीत करण्यात येते. विशेष म्हणजे स्वच्छतेच्या कामात नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे.- रवंींद्र देवतळे, मुख्याधिकारी, भंडारा.