शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही बावनथडी प्रकल्प निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:38 IST

पावसाळा सुरू होवून सुमारे दीड महिन्याचा कालावधी लोटला तरीही आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पात जलसाठा निरंक आहे. सध्या या प्रकल्पात मृतसाठा ७.५० टक्के असून ही शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे.

ठळक मुद्देमृतसाठा ७.५ टक्के : पावसाचा दगा, शेतकऱ्यांचा आशा मावळल्या

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पावसाळा सुरू होवून सुमारे दीड महिन्याचा कालावधी लोटला तरीही आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पात जलसाठा निरंक आहे. सध्या या प्रकल्पात मृतसाठा ७.५० टक्के असून ही शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे.महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवरील सीतेकसा गावाजवळ बावनथडी नदीवर राजीव सागर प्रकल्प उभारण्यात आला. ३५ वर्षापुर्वी या प्रकल्पावर दोनही राज्यांनी एक हजार ८३८ कोटी रूपये खर्च केले. त्यात महाराष्ट्राचा वाटा ८३६ कोटी आहे. दोन्ही राज्यांनी आपापल्या क्षेत्रात कालवे, वितरेकीची कामे पूर्ण केली. शेतकºयांकडून कोट्यवधींची जमीन खरेदी केली. या प्रकल्पात अनेक विघ्न आले. परंतु शेवटी हा प्रकल्प पुर्णत्वास आला. तुमसर तालुक्यासाठी हा प्रकल्प वरदान आहे. परंतु यंदा या प्रकल्पाचा जलसाठा निरंक आहे.दीड महिन्यापासून पावसाळ्याला प्रारंभ झाला. परंतु पावसाने दडी मारली. त्यामुळे बावनथडी नदी अद्यापही कोरडी आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास रबी हंगामात शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण जाणार आहे. शेतकºयांसोबत सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा असून कधी एकदा वरुण राजा बरसतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.मृतसाठ्यातून पाण्याचा विसर्ग नाहीबावनथडी प्रकल्पात उपयुक्त जलसाठा निरंक असून मृतसाठा ७.५० टक्के आहे. नियमानुसार मृत साठ्यातून पाण्याचा विसर्ग करता येत नाही. त्यामुळे आस्मानी संकटाचा सामना शेतकºयांना करावा लागत आहे. या धरणाकडून शेतकºयांना मोठी आशा होती. परंतु अपुºया पावसामुळे आशा मावळली आहे.पावसाची रिमझिमगत तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला. परंतु पाऊस रिमझिम कोसळत आहे. पावसाला जोर नाही. केवळ वातावरणात गारवा निर्माण झाला. यंदा जिल्ह्यावर निसर्ग कोपला आहे. धरण क्षेत्रात दमदार पाऊस नाही. मध्यप्रदेशातही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे सारे हतबल दिसत आहे.बावनथडी प्रकल्पात सध्या उपयुक्त जलसाठा निरंक असून मृतसाठा ७.५० टक्के आहे. मृतसाठ्यातून पाण्याचा विसर्ग करता येत नाही. धरण क्षेत्रात जोरदार पावसाची गरज आहे.-आर. आर. बडोले,उपविभागीय अभियंता, तुमसर