शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

लोकार्पणाआधीच तुमसर - गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कडा कोसळल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 11:35 IST

ओव्हरलोड वाहतुकीचा बसला फटका : अपघाताची शक्यता बळावली

मोहन भोयर लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : मनसर-गोंदिया-बालाघाट हा महाराष्ट्र व मध्य प्रदेशाला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग तयार होऊन सुमारे दीड वर्ष झाले. उसर्रा शिवारातील नवीन पुलाजवळील मातीच्या कडा कोसळल्या असून, येथे अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मार्गावर जड वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने त्या कोसळल्या असे समजते. परंतु, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे त्याकडे दुर्लक्ष दिसत आहे. येथे अपघाताची प्रतीक्षा तर महामार्ग प्राधिकरण करत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मनसर -रामटेक-तुमसर -गोंदिया बालाघाट असा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता सिमेंट काँक्रीटच्या असून, उसर्रा शिवारात मागील दहा ते पंधरा दिवसांपूर्वी या रस्त्याच्या कडा कोसळल्या आहेत. या रस्त्यावरून जड वाहतूक चोवीस तास सुरू राहते. त्यामुळेच या रस्त्याच्या कडा कोसळल्या अशी माहिती पुढे आली आहे. अजूनपर्यंत रस्त्याचे लोकार्पण झालेले नाही, हे विशेष. 

रखडले होते काम उसर्रा शिवारात उंच पुलामुळे शेतकऱ्यांनी काम बंद केले होते. त्याकरिता आंदोलनही करण्यात आले होते. याबाबत न्यायालयातही काही शेतकरी गेले होते. काही दिवसांपूर्वी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुलाचे बांधकाम केले. परंतु, या मातीच्या कडा आता कोसळायला सुरुवात झाली आहे. या महामार्गाने कोळशाचे ट्रक मोठ्या प्रमाणात धावतात. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. कडा कोसळल्याचे स्पष्ट दिसत असूनही अजून येथे महामार्ग प्राधिकरणाने गंभीरतेने घेतले नाही. राष्ट्रीय अधिक माहिती साठी QR कोड स्कॅन करा https://maa.ac.in/GermanyEmployment/ जर्मनी मध्ये नोकरीची संधी जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय अनुभव आणि नवीन संस्कृती यांचा आनंद घेण्याची इच्छा असेल. महामार्ग प्राधिकरण रस्ता बांधकाम व सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देते असे सांगण्यात येते, परंतु येथील कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

"महाराष्ट्र-मध्य प्रदेशला जोडणारा मनसर-बालाघाट हा महत्त्वपूर्ण राष्ट्रीय महामार्ग असून, या महामार्गाच्या उसर्रा शिवारात कड़ा कोसळल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. अपघातापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे." - अनिल बावनकर, माजी आमदार, तुमसर

टॅग्स :bhandara-acभंडारा