शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जप्त रेतीसाठा परिसरात प्रवेशबंदी

By admin | Updated: October 10, 2015 01:01 IST

जिल्ह्यातील रेतीघाटातून वाळू उचल करण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपुष्टात आली आहे.

पवनी : जिल्ह्यातील रेतीघाटातून वाळू उचल करण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपुष्टात आली आहे. दरम्यान रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पवनी व आजूबाजूच्या परिसरातून १,८०० ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला रेतीसाठा ठेवण्यात आलेल्या ठिकाणाहून रेती चोरी होऊ नये यासाठी, त्या ठिकाणाच्या २०० मीटर परिसरात पवनी तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी एम.यु. वाकलेकर यांनी पवनी तालुक्यात कलम १४४ लागू केले आहे. गुडेगाव येथील गंगाराम कांबळे यांच्या गट क्र. २१७ वर १,८०० ब्रास रेतीसाठा ठेवलेला आहे. जप्त करण्यात आलेल्या ठिकाणाच्या २०० मीटर अंतर परिसरात कोणत्याही प्रकारे ट्रॅक्टर, ट्रक, जेसीपी किंवा इतर रेती वाहतुकीचे साधन वापरता येणार नाही. रेती, माती, मुरुम, दगड याप्रकारचे कोणतेही गौण खनिज अवैधरित्या वाहतुक करता येणार नाही. सदर अधिसूचना सन २०१५-१६ या वर्षातील रेतीघाटांचा लिलाव होईपर्यंत राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)