शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

केबलवरील मनोरंजन महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 21:35 IST

ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनल निवडण्याची संधी मिळाली. मात्र ही संधी नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारी ठरू पाहत आहे. २०० ते २५० रुपये महिना शुल्क भरून अहोरात्र मनोरंजन करून घेणाऱ्यांना आता कमीत कमी ३०० ते ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथोरीटी आॅफ इंडियाने पे चॅनलची प्रभावी अंमलबजावणी सुरु केल्याने ग्राहकांना केबल आॅपरेटरकडे धाव घ्यावी लागत आहे.

ठळक मुद्देअनेकांचा हिरमोड : ट्रायच्या नियमांची शहरी व ग्रामीण भागात अंमलबजावणी

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनल निवडण्याची संधी मिळाली. मात्र ही संधी नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारी ठरू पाहत आहे. २०० ते २५० रुपये महिना शुल्क भरून अहोरात्र मनोरंजन करून घेणाऱ्यांना आता कमीत कमी ३०० ते ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथोरीटी आॅफ इंडियाने पे चॅनलची प्रभावी अंमलबजावणी सुरु केल्याने ग्राहकांना केबल आॅपरेटरकडे धाव घ्यावी लागत आहे.दूरचित्र वाहिण्यांवरून अहोरात्र बातम्या, चित्रपट, माहितीपूर्ण कार्यक्रम आणि मालिका सुरु असतात. प्रत्येकाच्या घरी केबल अथवा डीश अँटीना द्वारे कनेक्शन घेतलेले आहेत. यासाठी आतापर्यंत साधारणत: २०० ते २५० रुपये महिन्याला शुल्क भरावे लागत होते. परंतु ट्रायने १ फेब्रुवारीपासून ग्राहकांना आपले आवडते चॅनल निवडण्याची संधी दिली. मात्र ग्राहकांनी आपल्या आवडीचे चॅनल निवडल्यानंतर शुल्क पाहून डोळे पांढरे करण्याची वेळ आली. मनोरंजनासाठी कमीत कमी पैसा खर्च करण्याची ग्राहकांची मानसिकता असते. पूर्वी अ‍ॅनालॉक चॅनल पाहताना ग्राहकांना केवळ १०० रुपये खर्च करावे लागत होते. त्यानंतर सेट अप बॉक्सने सर्वांना डिजीटल प्रणालीची भुरळ घातली. मात्र केबल भाडे १०० वरून २०० ते २५० रुपये झाले. पूर्वीपेक्षा चॅनलची संख्या वाढल्याने कुणाची तक्रारही नव्हती.आता मात्र ट्रायच्या नवीन प्रणालीमुळे केबल भाडे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधीकरणाने लागू केलेल्या नवीन प्रणालीची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांनी केबल आॅपरेटरकडे धाव घेतली आहे. फ्री टू इयर १०० चॅनलसाठी ग्राहकांना १३० रुपये मोजावे लागणार आहे. याव्यतिरिक्त पे चॅनलसाठी वेगवेगळी रक्कम ग्राहकांना मोजावी लागेल. त्यात जीएसटी १८ टक्के राहणार आहे. म्हणजे घरातील दूरचित्रवाणीवरील मनोरंजन ३०० ते ४०० रुपयांच्या घरात जाणार आहे. आता या वाढत्या किमतीमुळे ग्राहकात चांगलाच असंतोष पसरला आहे. काही जण जिल्हा प्रशासनाकडे दाद मागणार असल्याची माहिती आहे. साकोली शहरात हजारो ग्राहक असून आता या ग्राहकांना नाहक फटका सहन करावा लागणार आहे.दूरचित्रवाणीवरील मनोरंजन आता पूर्वीपेक्षा महाग झाले आहे. सर्वसामान्यांना हा खर्च आवाक्याबाहेर आहे. पूर्वीप्रमाणेच दर करण्याची मागणी शासनाकडे करणार आहोत.-हेमकृष्ण वाडीभस्मे, ग्राहक, साकोली.ग्राहकांकडून अर्ज भरून त्यांना आवडेल ते चॅनल दिले जात आहे. मात्र दरात वाढ झाल्याने ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.-नितीन खेडीकर, केबल आॅपरेटर, साकोली.