लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तरुण अभियंत्याचा झालेला अपघाती मृत्यू संपूर्ण तुमसर वासीयांना चटका लावून गेला. कोका अभयारण्यातील सहल आटोपून गावी परतताना त्यावर काळाने घाला घातला. या घटनेने संपूर्ण तुमसर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.पंकज उर्फ मुन्ना शैलेश गायधने (२५) रा. नेहरु नगर तुमसर असे मृत अभियंत्याचे नाव आहे. तो आपल्या काही मित्रांसह दिवाळीनिमित्त कोका अभयारण्यात सहलीसाठी गेला होता. दिवसभर वनभ्रमंती केल्यानंतर सायंकाळी ते आपल्या दूचाकीने गावाकडे परतत होते. त्यावेळी कोका जंगलातील मंदिराजवळील एका वळणावर पंकजची दूचाकी स्लीप झाली. दूचाकीसह रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावर तो आदळला. डोक्याला गंभीर दुखापत झाली तसेच त्याचा सहकारी शुभम अरुण पाटील (२५) रा. बोसनगर तुमसर हा यात जखमी झाला. दोघांनाही प्रथम करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून भंडारा येथे उपचारासाठी नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त तुमसर शहरात पोहचताच प्रत्येकजण हळहळ करताना दिसत आहे.पंकज गायधने हा स्थापत्य अभियांत्रिकीचा पदवीधर असून त्याने नुकतीच राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. डिसेंबर महिन्यात तो आपल्या कर्तव्यावर रुजू होणार होता. पंरतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. घरातील मनमिळावू आणि मित्रमंडळीचा मुन्ना काळाने झडप घालून नेल्याने शहरावर शोककळा पसरली आहे.परिवारावर कोसळला दु:खाचा डोंगरघरातील तरुण मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने गायधने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंकजने अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर लोक सेवा आयोगाची परीक्षाही उत्तीर्ण केली होती. तो महिन्याभरात कामावर रुजू होणार होता. त्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण होते. पंरतु शुक्रवारी सायंकाळी एका क्षणात होत्याचे नव्हते झाले, आणि संपूर्ण परिवार दु:खात बुडाला.
अभियंत्याचा अपघाती मृत्यू चटका लावून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 21:36 IST
तरुण अभियंत्याचा झालेला अपघाती मृत्यू संपूर्ण तुमसर वासीयांना चटका लावून गेला. कोका अभयारण्यातील सहल आटोपून गावी परतताना त्यावर काळाने घाला घातला. या घटनेने संपूर्ण तुमसर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
अभियंत्याचा अपघाती मृत्यू चटका लावून गेला
ठळक मुद्देतुमसरमध्ये हळहळ : एमपीएससी परीक्षा झाला होता उत्तीर्ण, कोका अभयारण्यात दुचाकी अपघात