शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जामंत्र्यांनी मागितली २४ तासांची मुदत

By admin | Updated: August 15, 2016 00:19 IST

तालुक्यात कृषीपंपाची होणारे भारनियमन बंद करावे या मागणीसाठी तालुक्यातील शेतकरी जुलै महिन्यापासून वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या पाजऱ्या झिजवित आहेत.

प्रकरण साकोली तालुक्यातील कृषीपंपांच्या भारनियमनाचे : १६ पासून शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरु होणारसाकोली : तालुक्यात कृषीपंपाची होणारे भारनियमन बंद करावे या मागणीसाठी तालुक्यातील शेतकरी जुलै महिन्यापासून वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या पाजऱ्या झिजवित आहेत. मात्र यावर तोडगा न निघाल्यामुळे आज तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली व समस्या सांगितली. यावर उर्जामंत्र्यांनी २४ तासाची मुदत मागून दि. १६ ला यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. जोपर्यंत भारनियमन बंद होणार नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरुच राहणार असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला असून दि. १६ पासून वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर शेतकरी धरणे आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.यंदा शेतीसाठी अपेक्षीत पाऊस पडला नाही तरीही शेतकऱ्यांनी जसे जमेल तसे शेती केली तर काही शेतकऱ्यांची रोवणी आताही शिल्लक आहे. परिणामी पावसाअभावी धानाला पाणी होऊ शकत नाही. तर ज्या शेतकऱ्यांकडे विहिर व बोअरवेल आहे अशा शेतकऱ्यांमुळे भारनियमनाचे संकट आहे. यावर्षी उन्हाळ्यापासून कृषीपंपाला फक्त आठ तासच वीज पुरवठा मिळत आहे. त्यामुळे शेतीला पाणी पुरत नाही. त्यामुळे धान जगवायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे हे भारनियमन बंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. यासाठी तालुक्यातील शेतकरी मागील दोन महिन्यापासून वीज वितरण कंपनीच्या चकरा मारीत आहेत. मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही. आज सकाळी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूर येथे भेट घेतली व भारनियमनाचे विरोधात चर्चा करून भारनियमन बंद करा अशी मागणी केली. यावर उर्जामंत्री बावनकुळे यांनी या शेतकऱ्यांना २४ तासाची मुदत देवून दि. १६ ला नागपूर येथे खासदार नाना पटोले, आ.बाळा काशीवार, आ.चरण वाघमारे, आ.अ‍ॅड.अवसरे, वीज वितरण कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाला नागपूर येथे बोलाविल आहे. या बैठकीत या भारनियमनावर तोडगा काढू असे आश्वासन दिले आहे.पूर्वनियोजित दि. १६ पासूनचा धरणे आंदोलनाचा पवित्रा मात्र कायम ठेवला आहे. उर्जामंत्र्यांशी चर्चा करताना अविनाश ब्राम्हणकर, अशोक कापगते, नंदू समरीत, मदन रामटेके, बाबू बनकर, सुरेशसिंह बघेल, शालीकराम आसटकर, अंताराम खोटेले, केवळराम लांजेवार, जागेश्वर कापगते, सुधीर गोबाडे, नामदेव टेंभुर्णे सुखदेव इलमकर, अशोक बोरकर, नेतराम गहाणे, वसंता लांजेवार,अनिल खोटेले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)