शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेपर देऊन आल्यावर निघाली आजोबांची अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:08 IST

जन्म व मृत्यू अटळ आहे. परंतु कर्तव्य व कर्माला प्रथम प्राधान्य देऊन आलेल्या दु:खद प्रसंगाला बाजूला सारून नित्यकर्माला तुमसर येथे विद्यार्थीनी सामोरे गेली. घरी आजोबांचे पार्थिव असून तिने दहावीचा पेपर दिला.

ठळक मुद्देतुमसरातील घटना : उपस्थितांचे डोळे पाणावले

मोहन भोयर ।आॅनलाईन लोकमततुमसर : जन्म व मृत्यू अटळ आहे. परंतु कर्तव्य व कर्माला प्रथम प्राधान्य देऊन आलेल्या दु:खद प्रसंगाला बाजूला सारून नित्यकर्माला तुमसर येथे विद्यार्थीनी सामोरे गेली. घरी आजोबांचे पार्थिव असून तिने दहावीचा पेपर दिला. त्यानंतर आजोबांची अंत्ययात्रा काढण्यात आली. मृत्यूपूर्वी आजोबांनी आपल्या नातणीला परीक्षा देण्याची गळ घातली होती, हे विशेष. सदर प्रसंग तुमसर येथे सोमवारी घडला.इंदिरा नगरात सोविंदा बुधे (८०) यांचा वृद्धापकाळाने सोमवारी पहाटे निधन झाले. सोमवारी त्यांची नात हिचा इयत्ता दहावी भूमितीचा पेपर होता. आजोबाने आपल्या नातणीला वेळोवेळी शिक्षण व अभ्यासाचे महत्व सांगितले होते. मागील काही दिवसापासून आजोबा आजारी होते. नात त्यांची सेवा सुश्रृषा करायची.आजोबांची अत्यंत लाडाची असल्याने आजोबांच्या मृत्युमूळे ती पार खचून गेली. बालमन काय करावे ते तिला कळू देत नव्हते, परंतु आजोबांच्या संस्काराने ती कठोर झाली. घरी आजोबांचे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन नात जनता विद्यालयातील परीक्षा केंद्रावर दाखल झाली.तत्पूर्वी बुधे कुटुंबीयांनी सकाळी ११ वाजता अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नात धनश्री हिने हंबरडा फोडला. माझ्या आल्याशिवाय आजोबांची अंत्ययात्रा काढायची नाही, असे धनश्रीने कुटुंबियांना सांगितले होते.माजी नगरसेवक योगेश सिंनगजुडे यांनी बुधे कुटुंबियांची समजूत काढून धनश्री येईपर्यंत अंत्ययात्रेची तयारी करू. धनश्री आल्यावरच अंत्ययात्रा काढावी, अशी चर्चा करण्यात आली.धनश्रीचा पेपर दुपारी एक वाजता संपला. ती घरी परतली. त्यानंतर आजोबांची अंत्ययात्रा काढण्यात आली. धनश्रीने साश्रृनयनांनी आजोबाला अखेरचा निरोप दिला. त्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली. आजोबा व नात धनश्रीचे प्रेम पाहून उपस्थित नागरिकांना अश्रू आवरता आले नाही. जिवंतपणी दिलेल्या संस्काराची शिदोरी आजन्म प्रत्येकांनी जपावी, असाच मार्मिक उपदेश ही घटना देऊन गेली.