शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत मंदिराचे अतिक्रमण हटविले

By admin | Updated: September 15, 2015 00:33 IST

येथील गडकुंभली मार्गावरील साईमंदिर व संत सोनाजी महाराज मंदिराचे अतिक्रमण जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये हटविण्यात आले.

नाभिक समाजातर्फे घटनेचा निषेध : पंचायत समितीची इमारत होणार तयार साकोली : येथील गडकुंभली मार्गावरील साईमंदिर व संत सोनाजी महाराज मंदिराचे अतिक्रमण जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये हटविण्यात आले. ही कारवाई सकाळी ११ वाजताच्या सुमारास तहसीलदार यांच्या बंदोबस्तात पार पाडली. नाभिक समाजाने दिवसभर दुकान बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. येथील गडकुंभली रोडवर नवीन तहसील कार्यालयाचे बांधकाम वर्षभरापासून सुरु आहे. या इमारतीच्या बाजुला असलेल्या शासकीय जमिनीवर क्रांतीवीर हुतात्मा भाई कोतवाल स्मारक भूमीची जागा व त्यावर संत सेनाजी महाराज यांची मूर्ती ठेवून मंदिर तयार करण्यात आले होते. त्याच बाजुच्या जागेवर साईबाबांची मूर्ती मांडून मंदिर तयार करण्यात आले होते. या दोन्ही मंदिरात कार्यक्रम व्हायचे. महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. त्यावेळी साकोली येथील तहसील कार्यालय व पंचायत समितीची इमारत रस्त्यालगत आली. यात पंचायत समितीची इमारत बरीचशी पडली आहे. एकोडी रोडवर भाड्याच्या घरात सदर कार्यालय आहे. कार्यालय जुन्याच ठिकाणी असून गडकुंभली रोडवर तहसील कार्यालयाचे बांधकाम सुरु आहे.त्यामुळे नवीन पंचायत समितीची वास्तू तयार करण्यासाठी प्रशासनातर्फे याच तहसील कार्यालयाच्या बाजूची जागा निश्चित करण्यात आली व तसा प्रस्ताव साकोलीवरून जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविण्यात आला. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी सदर जागेवरील दोन्ही मंदिर पाडण्याचे आदेश दिले व या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तहसीलदार यानी पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही मंदिर भूईसपाट केले. यावेळी तहसीलदार शोभाराम मोटघरे, प्रभारी खंडविकास अधिकारी आर.व्ही. मेश्राम, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पाटील, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धुसर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)मूर्तीसह साहित्य पंचायत समितीत जमाया दोन्ही मंदिरातील संत सेनाजी महाराज व साईबाबांची मूर्ती व लोखंडी पाईप, टीन व इतर साहित्य साकोली पंचायत समितीचे प्रभारी खंडविकास अधिकारी आर.व्ही. मेश्राम यांच्या ताब्यात देण्यात आले असून त्या सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.तहसील कार्यालयामार्फत आठ दिवसापूर्वी पत्र देण्यात आले होते. मात्र आजच्या कार्यवाही संदर्भात सूचना देण्यात आली नाही. साकोली येथे अनेक मंदिरे सार्वजनिक जागेवर आहेत. शासनातर्फे त्या मंदिरावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र संत सेनाजी महाराज मंदिर पाडून शासनाने दुजाभाव दाखविला. या घटनेचा संघटनेमार्फत निषेध करीत आहोत.- जगदिश सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष .साकोली येथील पंचायत समितीची इमारत इतरत्र न बांधता जुन्याच जागी बांधण्यात यावी अशी मागणी आधीपासूनच गावकऱ्यांची असताना प्रशासनाने गावकऱ्यांना विश्वासात न घेता ही इमारत गडकुंभली रोडवर बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र ही पंचायत समितीची इमारत जुन्याच जागी बांधण्यात यावी.- हेमंत भारद्वाज, माजी ग्रा.पं. सदस्य .