अशोक पारधी ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : स्थानिक आठवडी बाजारात वैजेश्वर रस्त्यालगत तीन - चार वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर अतिक्रमण असल्याने लिलावात गाळे भाड्याने घेतलेल्या व्यावसायिकांनी अनामत रक्कम भरून त्या ठिकाणी दूकान थाटलेले नाही परिणामी पालिकेचे आर्थिक नुकसान झाले.अतिक्रमण असल्याने बाजारात मोकळी जागा उपलब्ध नव्हती. सार्वजनिक समस्या दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाने आठवडी बाजाराचा दिवस असूनही जेसीबी लावून बाजारातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.नगरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. सोबतच वृक्षारोपण करण्यात येत आहे. नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देऊन नगराला स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करणे सुरू केले आहे. मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पुढाकार घेऊन नगराला स्वच्छ व सुंदर करण्यासाठी दिवसरात्र एक करून प्रयत्न सुरू केले आहे. दर दिवसाला प्रत्येक प्रभागात सुर्योदयापूर्वी हजर राहून स्वच्छता व रस्त्यावरील अतिक्रमणे शोधणे व त्यावर कारवाई करणे हा नित्याचा उपक्रम सुरू केला आहे. बाजार चौकातील अतिक्रमण हटविण्याची मोहिम विठ्ठल गुजरी वार्डात फेरफटका मारतांना ठरली व विनाविलंब कारवाई सुरू करण्यात आली. दिवसभरात शॉपिंग कॉम्प्लेक्स समोरील संपूर्ण अतिक्रमण हटविण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली. मुख्याधिकारी, पदाधिकारी व पालिका कर्मचारी कारवाई दरम्यान हजर होते.
पवनीत चौकातील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 23:23 IST
स्थानिक आठवडी बाजारात वैजेश्वर रस्त्यालगत तीन - चार वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर अतिक्रमण असल्याने लिलावात गाळे भाड्याने घेतलेल्या व्यावसायिकांनी अनामत रक्कम भरून त्या ठिकाणी दूकान थाटलेले नाही परिणामी पालिकेचे आर्थिक नुकसान झाले.
पवनीत चौकातील अतिक्रमण हटविले
ठळक मुद्दे पालिकेची धडक कारवाई : कारवाईमुळे नागरिक धास्तावले