शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

अतिक्रमणाने ४० कुटुंबांचा जीव आला धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 21:52 IST

पुनर्वसीत वसाहतीलगत असलेल्या शासकीय जागेवर दोन शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणाने ४० कुटुंबांचा जीव धोक्यात आला आहे. सतत पाणी साचून राहत असल्याने शहरातील भगतसिंग वॉर्डातील घरे कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. या बाबत मुख्यमंत्र्यांपासून नगरपरिषदेच्या मुख्याधिकाºयांपर्यंत निवेदन दिली, उपोषण करण्यात आले. परंतु उपयोग झाला नाही.

ठळक मुद्देभगतसिंग वॉर्डातील प्रकार : मुख्यमंत्र्यांपासून नगरपरिषद सीओंपर्यंत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पुनर्वसीत वसाहतीलगत असलेल्या शासकीय जागेवर दोन शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणाने ४० कुटुंबांचा जीव धोक्यात आला आहे. सतत पाणी साचून राहत असल्याने शहरातील भगतसिंग वॉर्डातील घरे कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. या बाबत मुख्यमंत्र्यांपासून नगरपरिषदेच्या मुख्याधिकाºयांपर्यंत निवेदन दिली, उपोषण करण्यात आले. परंतु उपयोग झाला नाही.शहरातील पूरपीडितांचे १९६३ मध्ये पुनर्वसन करण्यात आले. त्यांना जागा देवून घरेही बांधण्यात आली. या घराच्या मागच्या बाजूला गावठाणाची शासकीय जागा आहे. परंतु गत काही वर्षांपासून दोन शेतकºयांनी या ठिकाणी अतिक्रमण केले आहे. या संपूर्ण जागेचा ताबा घेऊन लोखंडी गेट बसविले आहे. तसेच या नागरिकांच्या घरामागे शासकीय जागेवर ३० फुट खोल खड्डा केला. परिसरातील सांडपाणी वाहून जाण्यास त्रास होत आहे.खड्ड्यात सतत पाणी साचत असल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला. महत्वाचे म्हणजे या पाण्यामुळे घराच्या भिंती निकामी होण्याची भीती आहे. या भिंती दलदलीमुळे केव्हाही कोसळू शकतात. याबाबत परिसरातील नागरिकांनी वारंवार नगरपरिषदेला निवेदने दिली. परंतु उपयोग झाला नाही. या प्रकाराला कंटाळून १८ जून रोजी काही नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेत योग्य कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी मुख्याधिकाºयांना निर्देश देऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच चौकशीत तथ्य आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावर मुख्याधिकाºयांनी संबंधित दोन शेतकºयांना नोटीस पाठवून यावबाबत खुलासा मागविला. या सर्व प्रकरणात कारवाई झाली नाही. उलट या भागात दलदल निर्माण झाली. या परिसरातील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते देवीदास मारबते म्हणाले, शासन आणि प्रशासन आमच्या समस्येकडे लक्ष देत नाही. केवळ कागदी घोडे नाचविले जाते. याप्रकरणी तात्काळ कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.प्रशासन - शेतकºयांचे संगनमतगत अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरु आहे. या परिसरात सर्व मोलमजुरी करणारी मंडळी राहतात. शेतकरी त्यांना धमकावतात. प्रशासन याबाबत कोणतीच ठोस भूमिका घेत नाही. प्रशासन आणि शेतकºयांचे संगनमत असल्याचा आरोप या भागातील रहिवासी बाबू मेश्राम, शुक्राचार्य डोंगरे, संजय निंबार्ते, रुपचंद मेश्राम, खुशाल आवरकर, बाळकृष्ण बोरकर, विलास ऊके आदींनी केला. याबाबत मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदारांनाही निवेदन देण्यात आले आहे.