शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

शासकीय जमिनीवर अतिक्रमणाचा सपाटा

By admin | Updated: May 25, 2015 00:41 IST

लाखांदूर तालुक्यात ई वर्ग शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा सपाटा सुरू आहे. ग्रामस्थ ....

‘ई’ वर्ग जमीन : महसूल प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन गप्पबारव्हा : लाखांदूर तालुक्यात ई वर्ग शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा सपाटा सुरू आहे. ग्रामस्थ बिनदिक्कतपणे अतिक्रमण करीत असताना महसूल प्रशासन व संबंधित ग्रामपंचायत मात्र याकडे डोळेझाक करीत आहे. यामुळे गावातील चराई क्षेत्र उद्ध्वस्त होत आहे.लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ई वर्ग गावरान जमीन आहे. शासनाची प्रत्येक गावात ई वर्ग जमीन आहे. ही जमीन विविध प्रयोजनासाठी राखीव ठेवण्यात येते. या जमिनीचा योग्य वापर करून ती सुरक्षित तथा अबाधित रहावी म्हणून अशी जमीन संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहे. ही जमीन कुणीही खासगी उपयोगसाठी वापरू शकत नाही तसे झाल्यास संबंधित व्यक्तीविरूद्ध कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची असते. या जमिनीवर कुणी पिकही घेऊ शकत नाही.गावातील कुणी पीक घेण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तीविरूद्ध मुंबई अधिनियम १९५८ चे कलम ५३ अंतर्गत ग्रामपंचायतीने तात्काळ कारवाई करण्याची स्पष्ट तरतूद कायद्यात आहे. तथापि, जवळपास सर्वच ग्रामपंचायत प्रशासनाला या कायद्याचा विसर पडला आहे. या कायद्याचा वापर करून गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई अद्याप कोणत्याच ग्रामपंचायतीने केल्याचे ऐकिवात नाही.या ई वर्ग गायरान जमिनीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतीच्या या अनास्थेचा गावातील काही जण लाभ घेत आहेत. गावातील स्थानिक राजकारण कारवाईच्या आड येत असल्याने ग्रामपंचायत त्याकडे कानाडोळा करीत आहे. अनेक गावातील सत्ताधारी मतावर डोळा ठेवून गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यास चालढकल करतात. अतिक्रमण काढल्यास आपल्या खुर्चीला धोका पोहचण्याची धास्ती त्यांना भेडसावत असते. बहुतांश ठिकाणी तेथील सरपंच राजकारणामुळे अतिक्रमण धारकांना पडद्यामागून सहकार्य करीत असल्याचेही चित्र दिसून येते. परिणामी तालुक्यात गायरान जमीन गावातीलच नागरिकांकडून गिळंकृत करण्याचे प्रकार वाढत आहे. गावागावातील गायरान जमिनी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे जनावरांच्या चराईचा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे. याच जमिनीवर मोठ्या प्रमाणात जनावरे चराईसाठी नेले जातात. मात्र यावर अतिक्रमण होत असल्याने चराईचा क्षेत्रच आता कमी होत आहे. भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. (वार्ताहर)