शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सासऱ्याने केलेल्या अतिक्रमणाने सुनेचे सरपंचपद गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:01 IST

लाखांदूर तालुक्यातील तई बुज. ग्रामपंचायतीची निवडणूक २०१७ मध्ये पार पडली. यावेळी सरपंचाच्या थेट निवडणुकीत भाग्यश्री कैलास भेंडारकर निवडून आल्या. सरपंच पदावर आरूढ झाल्या. निवडणुकीनंतर गावातील राजकारण तापू लागले. गटबाजीला उत आला.

ठळक मुद्देलाखांदूर तालुक्यातील तई बु. चा प्रकार ।सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध

दयाल भोवते ।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : सासºयाने शासकीय जागेवर केलेल्या अतिक्रमणाने सुनेचे सरपंचपद जाण्याचा प्रकार लाखांदूर तालुक्यातील तई बु. येथे घडला. अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे यांनी सदस्यत्व अपात्र घोषित केल्याने सुनेला सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले.लाखांदूर तालुक्यातील तई बुज. ग्रामपंचायतीची निवडणूक २०१७ मध्ये पार पडली. यावेळी सरपंचाच्या थेट निवडणुकीत भाग्यश्री कैलास भेंडारकर निवडून आल्या. सरपंच पदावर आरूढ झाल्या. निवडणुकीनंतर गावातील राजकारण तापू लागले. गटबाजीला उत आला. अशातच शासकीय जागेवर सरपंच भाग्यश्री भेंडारकर यांच्या सासऱ्यांनी अतिक्रमण केल्याचा मुद्दा पुढे आला. गावातील मार्कंड वासूदेव सोनकुसरे यांनी १९ डिसेंबर २०१८ रोजी अप्पर जिल्हाधिकाºयांकडे तक्रार दाखल केली.सदर प्रकरणात तक्रारदार व सरपंचांनी लेखी म्हणणे व युक्तीवाद सादर केला. याप्रकरणात सरपंच भाग्यश्री भेंडारकर संयुक्त कुटुंबात राहत असून त्यांचे सासरे गोपीचंद भेंडारकर अतिक्रमण करून शासकीय जागा वापरत असल्याचे सिद्ध झाले. त्यावरूव अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४ ज (३) नुसार अपात्र घोषित करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सरपंच भाग्यश्री भेंडारकर यांना पायउतार व्हावे लागले. सासºयाच्या अतिक्रमणाचा फटका सुनेला बसला आहे.तई बु. येथील शासकीय गट क्रमांक ४७६ आर ०.१४ हेक्टर पैकी ०.० हेक्टर आर जागेवर गोपीचंद भेंडारकर यांचे नाव नमुना ई पंजीका २००३ मध्ये नोंदविण्यात आला आहे. सरपंच संयुक्त कुटुंबात सासºयांसोबत राहतात. सासºयांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले. सरपंच हे अतिक्रमण करणाºया व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य असल्यामुळे त्यांना ही बाब लागू होत असल्याचे सिद्ध होत आहे. जागा सद्धस्थितीत नियमाकुल केलेली नाही. त्यावरून अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले.

टॅग्स :sarpanchसरपंचEnchroachmentअतिक्रमण