शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांचा पालिकेला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:35 IST

पर्यायी व्यवस्था न करता सातत्याने अतिक्रमण धारकांची फुटपाथवरील दुकाने उचलून नेली जात आहे. या अन्यायाविरूद्ध दाद मागण्यासाठी संतप्त झालेल्या अतिक्रमण धारकांनी गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गांधी चौकातील पालिका कार्यालयाला घेराव घातला.

ठळक मुद्दे भंडारा पालिकेवर मोर्चा : आधी दुकाने द्या नंतरच अतिक्रमण हटवा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पर्यायी व्यवस्था न करता सातत्याने अतिक्रमण धारकांची फुटपाथवरील दुकाने उचलून नेली जात आहे. या अन्यायाविरूद्ध दाद मागण्यासाठी संतप्त झालेल्या अतिक्रमण धारकांनी गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गांधी चौकातील पालिका कार्यालयाला घेराव घातला.विशेष म्हणजे पालिका प्रशासनाने जिल्हा परिषद चौकातील दुकाने हटविली. मात्र शहरातील अन्य ठिकाणातील अतिक्रमण काढले नाही. अतिक्रमण काढायचे असल्यास सर्वांचेच काढा परंतु अशा दुकानदारांना पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करून द्यावी, अशी रास्त मागणी या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. यावेळी या आंदोलनकर्त्यांनी पालिका पदाधिकाºयांविरूद्ध घोषणाबाजीही केली.पालिका प्रशासनाने यापुर्वीही पर्याय व्यवस्था होईपर्यंत अतिक्रमण काढणार नाही, अशी ग्वाही दिली होती. मात्र हेतुपुरस्परपणे एकाच मार्गावरील दुकाने जबरदस्तीने हटविण्यात आली.पालिकेला घेराव घातला यावेळी प्रकाश चौधरी, अशोक क्षीरसागर, प्रेम खंगारे, राजेश मेश्राम, अरविंद माकडे, इमरोज खान, रमेश वाघमारे, अमर घोलपे, सुनिल घोलपे, सुनिल बोंदरे, दिनेश बांगडे, घनश्याम बोंदरे, सेवक क्षीरसागर, शमीम खान रफीक खान, विनोद डोरले, नरेंद्र अमनकर, फारूख खान, संतोष घोडमारे आदी उपस्थित होते.विशेष म्हणजे या आंदोलनकर्त्यांनी लोकमत कार्यालय गाठून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची आपबिती कथन केली.