शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सहकारी संस्थांचे सक्षमीकरण आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 01:21 IST

सहकार विभागाच्या वतीने भंडारा जिल्हयात अटल महापणन विकास अभियानांतर्गत लोकसंवाद जनजागृती मोहिमेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित लोकसंवाद मोहिमेचे उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांचे हस्ते झाले.

ठळक मुद्देजिल्हा उपनिबंधकांची माहिती : जिल्ह्यात लोकसंवाद जागृती मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अटल महापणन विकास अभियानाच्या माध्यमातून जिल्हयामध्ये सहकारी संस्था आधारभूत धान खरेदी केंद्र चालविणे, बारदाना खरेदी विक्री, बि-बियाणे व रासायनिक खते खरेदी विक्री करणे इत्यादी व्यवसाय केले जातात. या अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यातून १५ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था- खरेदी विक्री संस्थांची निवड करण्यात आली आहे. सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हयात लोकसंवाद जागृती मोहिम राबविली जात आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर यांनी दिली.सहकार विभागाच्या वतीने भंडारा जिल्हयात अटल महापणन विकास अभियानांतर्गत लोकसंवाद जनजागृती मोहिमेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित लोकसंवाद मोहिमेचे उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांचे हस्ते झाले. अटल अर्थसहाय्य समितीचे सदस्य शिवराम गिºहेंपूंजे, पुर्ती अटल संस्थेचे अध्यक्ष धनश्याम खेडीकर, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था पालांदूरचे अध्यक्ष विजय कापसे, शेतकरी उत्पादन कंपनीचे संजय एकापूरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, खरेदी विक्री संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचत गट यांच्या बळकटीकरणासाठी जिल्हयात अटल महापणन विकास अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जवळपास ३५ प्रकारचे विविध व्यवसाय संस्था निवड करु शकतील. या द्वारे संस्थांचे व सभासदांचे सक्षमीकरण व बळकटीकरण होण्यास हातभार लागणार आहे. या व्यवसायाची जनजागृती व्हावी व ते सहकारी संस्थांपर्यंत पोहचावे या उद्देशाने लोकसंवाद जनजागृती मोहिम राबविण्यात येत असल्याचे देशकर यांनी सांगितले.गतवर्षी ज्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी असे व्यवसाय करुन त्यांचे सभासदांना पिक कर्ज, मुदत कर्ज देवून उत्तम सेवा दिली व सदर व्यवसायातून नफा कमविला अशा संस्थांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली.त्यामध्ये प्रथम क्रमांक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सुकळी, द्वितीय क्रमांक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित वडद व तृतीय क्रमांक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. गोंडउमरी या संस्थांना राज्यस्तरावर कार्यक्रम घेऊन, त्यांना पुरस्कार व रोख रक्कम अदा करण्यात आले. तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. पालांदूर या संस्थेने सभासदांना दिलेल्या सेवा व सुरु केलेल्या इतर व्यवसायात नफा मिळविल्याने राज्यस्तरावर यशोगाथा प्रसिध्द करण्यात आली.अटल महापणन अभियान अंतर्गत निवड केलेल्या संस्थांनी पुढाकार घ्यावा हा या मागील मुख्य हेतू आहे. या अभियानात जिल्हयातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर यांनी केले. शिवराम गिºहेंपुंजे, घनश्याम खेडीकर, संजय एकापूरे व विजय कापसे यांनी मार्गदर्शन केले. योजनेनुसार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी विविध व्यवसाय हाती घेवून, संस्थेच्या सभासदांना सेवा पुरवावी व संस्थेचे बळकटीकरण करावे, असे विचार मांडले. आभार एच.के. हटवार यांनी मानले.संस्थांना १३ लाखांचा नफाया अभियानाच्या माध्यमातून जिल्हयात १०५ संस्थांनी सामंजस्य करार केला असून १८ संस्थांनी प्रत्यक्ष व्यवसाय सुरु केला आहे. या व्यवसायात २१ लाख ६८ हजार ४०० रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून ७ कोटी ४३ लाख ४३ हजार ७१० रुपयांची उलाढाल झाली आहे. या संस्थांना रक्कम रुपये १२ लाख ९० हजार ३४ निव्वळ नफा झाला.