शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मिरची तोडणीमुळे महिलांना मिळतोय रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:30 IST

परिसरात सध्या मिरची तोड्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामध्ये सर्वाधिक मजूर महिला कार्यरत आहेत. मिरची तोडणीचे काम वाढत्या तप्त वातावरणात अंगाची लाही लाही करणारे असले तरी मात्र या कामामुळे मजूर महिला वर्गाच्या हाताला रोजगार मिळत आहे. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीत परिसरातील शेतकऱ्यांच्या संसाराला हातभार लागण्यास मदत होत आहे.

ठळक मुद्देतोड्याचा हंगाम अंतिम टप्यात : अड्याळ परिसरात अनेक ठिकाणी मिरचीचे उत्पादन

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : परिसरात सध्या मिरची तोड्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामध्ये सर्वाधिक मजूर महिला कार्यरत आहेत. मिरची तोडणीचे काम वाढत्या तप्त वातावरणात अंगाची लाही लाही करणारे असले तरी मात्र या कामामुळे मजूर महिला वर्गाच्या हाताला रोजगार मिळत आहे. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीत परिसरातील शेतकऱ्यांच्या संसाराला हातभार लागण्यास मदत होत आहे.रबीचे क्षेत्र घटले असल्यामुळे महिलावर्गाला ग्रामीण भागात काम मिळेणासे झाले आहे. त्यामुळे मिरची तोड्याचा हंगाम परिसरातील महिलांसाठी फायदेशीर ठरत असल्याची प्रतिक्रिया यावेळी महिलांनी बोलताना दिली.अड्याळ आणि परिसरातील शेती ही निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न खूपच कमी आहे. शेतीला पूरक व्यवसाय उपलब्ध नसल्याने खरीप हंगामातील मिरची पिक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे पिक आहे. धानपिकातून शेतकºयांना कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही . त्यातही गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती गोसे धरणात गेली असल्याने येथील कामगारांना मजूरीशिवाय दुसरा पर्याय नाही.महिला मजुरांना दहा रुपये किलो दराप्रमाणे पैसे मिळत असल्याने दिवसाकाठी प्रत्येक महिलेला दिडशे ते दोनशे रुपये रोजगार उपलब्ध होत आहे. आणखी काही दिवस मिरची तोड्यासह रबीचा हंगाम सुरु असल्याने काही दिवस तरी रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महिला मजूर आनंदीत आहेत.रोहयो कामाची गरजशेतकरी वर्गाला यावर्षी निसर्गाचा फटका बसल्याने खरीप पिकाचे उत्पन्न मिळाले नाही. रबीचीही पेरणी न झाल्याने शेतकऱ्यांना सध्या उसणवार करुन व्यवहार करावे लागत आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना बँकेचे पीक कर्ज सोसायट्या भरणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे शासनाने गावोगावी रोजगार हमी योजनेची कामे सुरु करुन मजुरांना दिलासा देण्याची गरज आहे.