शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगातून दहा हजारांवर मजुरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:53 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत साकोली तालुक्यात २०१८-१९ या वर्षात सुरु ुअसलेल्या विविध कामांतून १० हजाराहून अधिक मजुरांना रोजगार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यात मजुरांना सर्वाधिक रोजगार साकोली तालुक्यात मिळाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात साकोली तालुक्याची आघाडी : ६५ ग्रामपंचायतींअंतर्गत विविध कामे सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत साकोली तालुक्यात २०१८-१९ या वर्षात सुरु ुअसलेल्या विविध कामांतून १० हजाराहून अधिक मजुरांना रोजगार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यात मजुरांना सर्वाधिक रोजगार साकोली तालुक्यात मिळाला आहे.उन्हाळ्यात रोजगार मिळावा यासाठी केंद्र शासनाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नागरिकांना १०० दिवस रोजगार दिला जातो. साकोली तालुक्यात असलेल्या ६५ ग्रामपंचायत स्तरावर मजुरांना नाला सरळीकरण, पांदण रस्ते, तलाव खोलीकरण, सिंचन विहिरी, भातखाचरे, घरकुल अशी विविध कामे सुरू करण्यात आलेली आहेत.नाला सरळीकरणाच्या कामावर २९६ मजूर, पाटाची दुरूस्तीसाठी ११५० मजूर, पांदण रस्त्यासाठी ५,१०४ मजूर, तलाव खोलीकरणासाठी २,२११ मजूर, सिंचन विहिरीसाठी, भातखचरा, घरकुलाचे कामांवर १० हजार ४९२ मजूर कार्यरत आहेत.दररोज कार्यरत मजुराच्या उपस्थितीमध्ये बदल होत असतो. साकोली तालुक्यात ११२ कामापैकी ७० कामे पूर्ण झाली असून ४२ कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये पांदण रस्ते २६, पाटाची दुरुस्ती १३, बोडी तलाव २१, सिमेंट रस्ते २, गुरांचे गोठे १३, शेडचे गोठे २, मजगी १९, सिंचन विहिरी १, कच्ची नाली १ अशी ११२ कामे त्यापैकी ७० कामे पूर्ण व ४२ कामे प्रगतीपथावर आहेत.६ कोटी ३८ लाख ५६ हजार ४५६ रुपये मजुरीचे वाटप करण्यात आले. त्यापैकी अकुशल कामाचे ३ कोटी ८३ लाख १३ हजार ८१९ रुपये व कुशल कामाचे २ कोटी ५५ लाख ४२ हजार ६४६ एवढी मजुरी एका महिन्यात देण्यात आली. साकोलीचे खंडविकास अधिकारी सुनिल तडस, पंचायत विस्तार अधिकारी के.डी. टेंभरे व रोजगार हमी योजनेचे समन्वयक रंजन बोरकर हे रोजगार हमीच्या कामावर लक्ष ठेऊन आहेत.मागीलवर्षी भंडारा जिल्हा ठरला अव्वलमागीलवर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक कामे करण्यात आली. रोजगार देणारा जिल्हा अशी ओळख या कामांमुळे राज्यात झाली होती. मागीलवर्षी पांदन रस्ते, नाला सरळीकरण आणि तलाव खोलीकरण व घरकुलाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. यावर्षी जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात कामे सुरू असली तरी साकोली तालुक्यात आजघडीला १० हजारांहून अधिक लोकांच्या हाताला काम मिळालेले आहे. यावर्षीही ही संख्या सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे.