शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

रोजगार सेवकाने केला अपहार

By admin | Updated: September 1, 2015 00:35 IST

तालुक्यातील गटग्रामपंचायत वलमाझरी येथील रोजगार सेवकाने रोजगार हमी योजनेच्या कामात बोगस मजूर दाखवून अपहार केल्याचा आरोप ग्रामसभेत करण्यात आला.

ग्रामसभेत घेतला ठराव : वलमाझरी येथील प्रकारसाकोली : तालुक्यातील गटग्रामपंचायत वलमाझरी येथील रोजगार सेवकाने रोजगार हमी योजनेच्या कामात बोगस मजूर दाखवून अपहार केल्याचा आरोप ग्रामसभेत करण्यात आला. त्यामुळे या ग्रामरोजगार सेवकाला पदावरून कमी करण्यात यावे असा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या ग्रामरोजगार सेवकाने किती रुपयाचा अपहार केला याची चौकशी झाली नसून तशी तक्रारही सरपंच व सचिव यांनी पंचायत समिती व पोलीस ठाण्यात दिली नाही. त्यामुळे या रोजगार सेवकासोबत अपहार करण्यात कोण कोण होते याचा उलगडा होऊ शकला नाही.शासन नियमानुसार १५ आॅगस्ट रोजी वलमाझरी येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र यावेळी ग्रामरोजगार सेवक यांच्यावर लावण्यात आलेले आरोप व त्यावर चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे ही ग्रामसभा थांबवून पुन्हा दि. १२ आॅगस्ट रोजी पिटेझरी येथे पोलीस बंदोबस्तात घेण्यात आली. यात ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मार्च २०१५ ला झालेल्याकामाचे हजेरी पत्रक वाचन करताना दि. ९ मार्च ते १५ मार्च या दरम्यान काही मजुरांची नावे कामावर हजर नसताना सुद्धा हजेरी पत्रकावर हजेरी दाखवून प्रत्यक्ष गैरव्यवहार केल्याचे आढळून आले. गोरख मेश्राम, लिलाधर गहाणे, सुधीर टेकाम यांनी गैरव्यवहार असल्याचे मान्य केले. तसेच मेघा नागदेवे, वैशाली कोवे, स्वाती टेकाम ही व्यक्ती त्यांच्या पतीच्या गैरहजर असल्याचे मान्य केले. आणखी काही नावे व इतर हजेरी पत्रकातील नावे सादर करण्याची पुरुषोत्तम रुखमोडे यांनी ग्रामसभेत सांगितले. त्यामुळे ग्रामरोजगार सेवक झिंगर कापगते यांना रोजगार सेवक पदावरून कमी करण्याचे ग्रामसभेने सर्वानुमत ठरविण्यात आल्याचे ठराव घेण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)