तुमसर : रोजगाराची हमी कामे कमी, असा प्रकार तुमसर तालुक्यातील देव्हाडी ग्रामपंचायतीमध्ये दिसून येत आहे. सन २०१५-२०१६ मध्ये एक कोटीची विविध कामे प्रस्तावित केली. पंरतु आतापर्यंत एकाही कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही. पावसाळा सुरु होण्याकरिता केवळ महिना शिल्लक आहे. येथे ७६१ जॉब कार्डधारक मजूर आहे. कामे उपलब्ध न झाल्याने कारवाईची येथे शक्यता आहे.सन २०१५-२०१६ या वर्षात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत देव्हाडी ग्रामपंचायतीने विविध ५४ कामे प्रस्तावित केली. एक कोटीची ही कामे आहेत. नियोजन करण्यात आले, परंतु प्रत्यक्ष कामे मात्र येथे सुरु झाली नाहीत. यात बंधारा दुरुस्ती, संलाग तयार करणे, कच्ची नाली बांधकाम, पादचारी, फळबाग लागवड (वैयक्तिक), सिंचन विहिर (तीन) (वैयक्तिक), गुरांचा गोठा बांधकाम (१३ लाभार्थी), नऊ पांदन रस्ते, आठ सिमेंट रस्ते, एक सिमेंट नाली या कामांचा समावेश आहे. केवळ कामे प्रस्तावित आहे. येथे जॉब कार्डधारक मजूरांची संख्या ७६१ आहे. मजूर कामाच्या प्रतिक्षेत आहे. नियोजनाचा अभाव व दप्तर दिरंगाईमुळे कामे सुरु झाली नाही. पावसाळा एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. तालुका प्रशासनान संबंधित ग्रामपंचायतीला जाब विचारण्याची गरज आहे.सन २०१३-१४ मध्ये १२ लाख १२ हजारांची कुशल अकुशल कामे मंजूर झाली होती. ६ लाख ४ हजारांचे कामाचे येथे लक्ष्यापैकी ३ लक्ष ४२ हजार ३१९ रुपयांची कामे करण्यात आली. यात वृक्ष लागवडीचा समावेश होता. १ लक्ष २० हजार ६६५ रुपये (आठ हजार) व १ लक्ष ४३ हजार ७१३ (६ मजूर) मजूरी देण्यात आली. १ एप्रिल ते २ मार्च २०१३ पर्यंत होते. पांदन रस्त्यावर ३८ हजार ६८१ रुपये, दुसऱ्या पांदन रस्त्यावर १४ हजार ४३७ रुपये व सिमेंट रस्ता बांधकाम ३६ हजार ७४६ रुपये मंजूरी मजूरांना प्राप्त झाली.५९ कुटुंबानी कामाची मागणी केली. केवळ ७९ मजुरांना कामे मिळाली. ७६१ कार्डधारक मजूरांना ३ हजार ९ मनुष्य दिवस कामे देण्यात आली. १०३ मस्टर निघाले. सरासरी मजूरी एका मजुराला १२३ रुपये ८७ पैसे प्राप्त झाली. जास्तीत जास्तमजूरी १४१ रुपये तर कमी कमी मजुरी ८४ रुपये देण्यात आली. तालुक्यात मोठी व श्रीमंत ग्रामपांयत म्हणून देव्हाडीचा लौकीक आहे. येथे सध्या प्रभारी ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नियमित ग्रामविस्तार अधिकारी नाही. अधिकाऱ्यांचे येथे दुर्लक्ष दिसून येत आहे. रोजगार हमीचा कामांना विलंब प्रकरणी येथे जबाबदारांवर कारवाईची गरज आहे. खंडविकास अधिकाऱ्यांचे येथे दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
रोजगाराची हमी, कामे कमी
By admin | Updated: May 15, 2015 00:36 IST