शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 21:57 IST

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे जिल्हा शाखा भंडारा यांची त्रैमासिक सभा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात गुरुवारला झाली. सभेत संघटनेकडून मांडण्यात आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी विभाग प्रमुखांना दिलेत.

ठळक मुद्देसीईओंचे आश्वासन : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे जिल्हा शाखा भंडारा यांची त्रैमासिक सभा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात गुरुवारला झाली. सभेत संघटनेकडून मांडण्यात आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी विभाग प्रमुखांना दिलेत.संघटनेकडून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत समस्या त्यांच्याकडे मांडण्यात आल्या. त्यामध्ये २९ आॅगस्ट २०१८ ला संघटनेची सभा झाली होती त्याचे इतिवृत्त ७ ते ८ महिने उशीरा प्राप्त झाल्याचे निदर्शनास आणून दिले. याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली. विनय रामप्रसाद सुदामे यांना सेवा ज्येष्ठतेप्रमाणे आरोग्य सहायक या पदाचा मानीव दिनांक देण्यात यावा, सदर प्रकरण विभागीय आयुक्त नागपूर यांना ७ दिवसाच्या आत सादर करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले.शामकला रविंद्र पचंभाई यांच्यावर अनुकंपा भरतीत झालेल्या अन्याय दुर करण्यात येवून त्यांना कनिष्ठ सहायक पदाचा मानीव दिनांक देण्यात यावा व संपूर्ण चौकशी करण्यात यावी यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर प्रकरणाचा प्रस्ताव ३ दिवसात चौकशी करुन विभागीय आयुक्तांना सादर करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले. सन २०१७-१८ ची जीपीएफ स्लीप कर्मचाºयांना मिळाली नाही यावर १५ दिवसात कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. ६ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे हप्ते जीपीएफ खात्यात जमा न करता काही हप्ते जीपीएफ ला तर काही हप्ते एनपीएस खात्यात जमा करण्यात आल्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या दुबे पं.स. लाखांदुर यांना पैसे परत मिळाले नाही, यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश वित्त विभागास दिले.विस्थापित रँडम व पती-पत्नी एकत्रीकरणामध्ये शिक्षण प्राथ. विभाग यांच्याकडून फारच निष्काळजीपणे व प्रकरण संथगतीने हाताळला असून बदली प्रक्रियेतील दोषी आढळलेल्या १३ शिक्षकांवर व अपंगत्वाचे १५ प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच जिल्हा परिषद शाळा खरबी येथील एक शिक्षीका ७ तारखेला मृत्यू पावली, त्यांच्या जागेवर १० तारखेला खाजगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकाला कसे काय सामावून घेण्यात आले. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येवून रँडम, विस्थापीत व पती-पत्नी एकत्रीकरणातील अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय देण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आठ दिवसात कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभाग प्राथमिक यांना दिले. आरोग्य विभागातील कर्मचाºयांची पदोन्नती येत्या तीन दिवसात करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिले.संघटनेची सभा शासन निर्णय ३ मार्च २०१८ नुसार दर तीन महिन्यानी लावण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संघटनेला दिले. जैराम महादेव शेंडे यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेवेत सामावून घेत मागील संपूर्ण थकबाकी देण्यात यावी अशी संघटनेकडून मागणी करण्यात आली. जि.प. मुद्राणालयातील दोन कर्मचारी यांना वर्ग-३, वर्ग-४ च्या पदावर जि.प. सेवेत सामावुन घेण्यात यावे, नम्रता विलास पाटील यांना अनुकंपा तत्वावर शिक्षण सेवक या पदावर सामावून घेण्यात यावे, अशा अनेक प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्यात आली, सदर सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .प्रशांत उईके, शिक्षणाधिकारी प्राथ. लक्ष्मण पाच्छापुरे, नितीन शर्मा, मेश्राम व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.सभेला संघटनेच्या शिष्टमंडळात उपमहासचिव सुर्यभान हुमणे, जिल्हा अध्यक्ष विनय सुदामे, जिल्हासचिव हरिशचंद्र धांडेकर, उपाध्यक्ष सिध्दार्थ भोवते, विधी सल्लागार अ‍ॅड. बाबुराव दामले, अजय रामटेके, युवराज देशभ्रतार, दिनेश मेश्राम, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शंभू घरडे, सचिव बाबुराव गिºहेपुंजे, अचल दामले, कविता राऊत, सिध्दार्थ चौधरी, शामकला पंचभाई, जयराम शेंडे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.