शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
4
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
5
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
6
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
7
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
8
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
9
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
10
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
11
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
12
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
13
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
14
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
15
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
16
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
17
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
18
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
19
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
20
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री

नगरपंचायतींना कर्मचाऱ्यांची वाणवा

By admin | Updated: January 29, 2016 04:08 IST

राज्य शासनाने लाखनी ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायत स्थापन केली. निवडणुका होऊन नगराध्यक्ष उपाध्यक्ष व

चंदन मोटघरे ल्ल लाखनीराज्य शासनाने लाखनी ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायत स्थापन केली. निवडणुका होऊन नगराध्यक्ष उपाध्यक्ष व नगरसेवक निवडून आले. नगरविकास खात्याने नगरपंचायतमध्ये कर्मचाऱ्यांना नियुक्त न केल्यामुळे जनतेची गैरसोय होत आहे. लोकांच्या कामाची पुर्तता करण्यात नगरसेवकांना अडचणी येत आहेत.लाखनी ग्रामपंचायतच्या पाच कर्मचाऱ्यांच्या भरवशावर लाखनी नगरपंचायतचे कामकाज सुरु आहे. पाच कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतच्या कामाचा अनुभव आहे. नगरपंचायतचे अधिनियम वेगळे आहेत. म्हणून अनेक कामाबद्दल व निर्णय घेण्याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. लोकनियुक्त पदाधिकारी जनतेच्या समस्यांना न्याय देवू शकत नाही. नगरविकास मंत्रालयाने लाखनी नगरपंचायतला आकृतीबंध पाठविला नाही. एकही स्थायी कर्मचारी नगरपंचायतला नाही. नगरपंचायतचे प्रशासकीय कामकाज चालविण्यासाठी मुख्याधिकाऱ्याचा प्रभार तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अश्विनी जाधव यांना दिला आहे. त्या नगरपंचायत कार्यालयात भटकत नाही. स्वाक्षऱ्यासाठी कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालयात जावे लागते. अभियंता हे दर बुधवारी येतात. जर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक असेल तर अभियंता एकएक आठवडा लाखनी नगरपंचायतला येत नाही. अभियंता जांभुळकर हे भंडारा नगरपरिषदेचे कर्मचारी आहे. करनिर्धारण अधिकारी तुमसर नगरपरिषदेचे कर्मचारी आहे. अनेक दिवसांपासून त्यांनी लाखनी नगरपंचायतला भेट दिली नाही. शासनाने लाखनी नगरपंचायत दिली परंतु नगरपंचायतला कामकाज सांभाळण्यासाठी कर्मचारी दिले नसल्यामुळे जनतेत असंतोष आहे. लाखनीची लोकसंख्या १२,६३६ आहे. लाखनी नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोअरवेल, रस्ते, नाल्या, पथदिवे यांच्या दुरुस्तीचे काम बंद आहे. त्यामुळे नागरिाकां मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. मुख्याधिकारी जाधव हे नगरपंचायत कार्यालयात येत नाही. बोअरवेल दुरुस्तीचे बिल, ब्लिचिंग पावडरचे बिल, इलेक्ट्रीक साहित्यांचे बिलांवर त्यांनी स्वाक्षरी न केल्याने नवीन कामे कशी करणार अशी नगरपंचायत पदाधिकाऱ्यांची स्थिती आहे.शासनाने नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी नगराध्यक्ष कल्पना भिवगडे, बांधकाम सभापती दत्ता गिऱ्हेपुंजे, नगरसेवक अनिल निर्वाण यांनी केली आहे. मागणीची पूर्तता न झाल्यास नगरपंचायतला टाळेबंदी करणार असल्याची माहिती लोकमत प्रतिनिधीला दिली आहे. प्रभारी अधिकाऱ्याच्या भरवशावर कामकाज चालत आहे. अधिकारी नगरपंचायतमध्ये येत नाही. अभियंता आठवड्यातून एकदा येतात. बाकी कर्मचारी महिन्यातून एकदाही येत नाही. शासनाने लाखनी नगरपंचायतीची थट्टा मांडली आहे.- कल्पना भिवगडे, नगराध्यक्ष, नगरपंचायत, लाखनीजुन्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांवर नगरपंचायतीची भिस्त आहे. त्यांना नियमांचे परिपूर्ण ज्ञान नाही. निर्णय घेण्यात विलंब होत आहे.- दत्ता गिऱ्हेपुंजे, सभापती, नगरपंचायत, लाखनी.कर्मचाऱ्यांची नियुक्ती तात्काळ करावी अन्यथा नगरपंचायतला टाळेबंदी केली जाईल. आंदोलन उभे केले जाईल. जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीची पूर्तता करावी.- अनिल निर्वाण, नगरसेवक, नगरपंचायत, लाखनी.