शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
4
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
5
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
6
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
9
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
10
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
11
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
12
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
13
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
14
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
15
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
16
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
17
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
18
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
19
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
20
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...

देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचार्‍यांची मुजोरी

By admin | Updated: June 5, 2014 23:48 IST

देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनियमितता असून २४ तास रुग्णांना सेवा पुरविली जात नाही. आरोग्य केंद्र परिसरात गवताचे जंगल तयार झाले आहे. कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत.

तुमसर : देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनियमितता असून २४ तास रुग्णांना सेवा पुरविली जात नाही. आरोग्य केंद्र परिसरात गवताचे जंगल तयार झाले आहे. कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. ५ ते १0 वर्षापासून स्थानांतरण का झाले नाही असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाची चौकशी व दोषींवर कारवाई न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा गावकर्‍यांनी दिला आहे.जिल्हा परिषदेअंतर्गत देव्हाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सुमारे २४ हजार नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी या आरोग्य केंद्राची आहे. या परिसरातील १८ ते २0 गावांना हे आरोग्य उपकेंद्र सेवा पुरविते. परंतु सध्या हे आरोग्य केंद्रच आजारी दिसत आहे.येथील कर्मचारी येणार्‍या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी उद्धट बोलतात. अपमानास्पद वागणूक देतात. उलट उत्तरे देणे येथे नित्यनियमांची बाब आहे. येथे डॉक्टर व कर्मचार्‍यांकरिता सदनिका आहेत. परंतु ते येथे राहत नाहीत. २४ तास सेवा पुरविण्याचा नियम असताना ती पुरविली जात नाही. मागील ५ ते १0 वर्षापासून कर्मचार्‍यांचे स्थानांतरण झाले नाही. अपडाऊन करणे हाच एकमेव व्यवसाय सुरु आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रुग्णांनी पाठ फिरविली आहे. सुमारे ७0 ते ८0 लक्ष रुपये खर्च करून इमारती तयार करण्यात आल्या आहेत. आरोग्य केंद्र परिसरात गवताचे जंगल तयार झाले आहे. गांधी वॉर्डात नवीन उपकेंद्र सुरु करण्यात आले होते. दोन दिवसानंतर ते कायम बंदच आहेत. शासनाचा वेतन येथे नियमित घेतला जात आहे. परंतु कर्तव्य पार पाडले जात नाही. तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी येथे ढुंकूनही पाहत नाहीत. जनतेच्या पैशाचा अपव्यय करणे येथे सुरु आहे. येथील आरोग्य केंद्र प्रमुख डॉ.कुरैशी यांचेकडे अनेकदा मौखीक तक्रारी करण्यात आल्या. परंतु त्यांनी आतापर्यंत लक्ष दिले नाही .येथील कर्मचारी उपकार केल्यासारखे वावरत आहेत. ५ ते १0 वर्ष झालेल्या कर्मचार्‍यांचे त्वरीत स्थानांतरण न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा गावकर्‍यांनी दिला जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना पाठविलेल्या तक्रारीतून केला आहे. जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी येथे भेट देऊन स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थांशी चर्चा करण्याचीही मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)