शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

१०८६ सेवाविषयक प्रकरणांचा तातडीने निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 22:13 IST

शासकीय सेवेत अख्खे आयुष्य सेवा करून जर स्वत:च्या समस्या निकाली काढण्यासाठी त्रास सहन करावा लागत असेल तर त्यांचा शासकीय कामावर परिणाम होऊन प्रशासकीय कामाची गती मंदावत असते.

ठळक मुद्देउपक्रमाचे कौतुक : मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सूर्यवंशी यांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासकीय सेवेत अख्खे आयुष्य सेवा करून जर स्वत:च्या समस्या निकाली काढण्यासाठी त्रास सहन करावा लागत असेल तर त्यांचा शासकीय कामावर परिणाम होऊन प्रशासकीय कामाची गती मंदावत असते. सामान्य माणसाला एखाद्या विभागाकडून स्वत:ची समस्या निकाली निघण्याची अपेक्षा असते, त्याच प्रमाणे अधिकारी, कर्मचारीही अपेक्षा बाळगून असतात. जर ती समस्या एखाद्या अधिकाºयांच्या नजरेतून गेली आणि त्यावर उपायाची फूंकर लागली तर प्रशासनाचा कारभार गतीने चालेल यात शंका नाही.भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी जिल्हा परिषद मधील विभागांना स्वच्छ व सुंदर करण्यासोबतच अधिकारी, कर्मचारी यांच्या अंतर्गत समस्यांचा अभ्यास केला. अधिकारी, कर्मचारी यांच्या समस्या निकाली निघाल्याशिवाय प्रशासनाची गाडी तेज गतीने पळणार नाही या निष्कर्षाप्रत पोहचून कालबद्ध वेळेत सेवाविषयक प्रकरणे निकाली काढण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रमाची घोषणा केली. सामान्य प्रशासनाच्या कार्यकुशलतेने व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार २५ सप्टेंबरपर्यंत १०८६ प्रकरणे निकालात काढून अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशासनातील कार्य गतीने करण्यासाठी मनोबल वाढविले आहे.एखाद्या अभियानाच्या काळात आणि कालबद्ध वेळेत ऐवढे प्रकरणे निकाली काढण्याचा हा पहिलाच इतिहास आहे. या नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रशासकीय कामकाज कार्य कुशलतेचा परिचय देणारे ठरले आहे.देशभर १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्याबाबतचे निर्देश प्राप्त झाले. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे मार्गदर्शनात संपूर्ण भंडारा जिल्ह्यात हे अभियान राबविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी करून स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. शपथ घेण्यापासून तर वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छता करण्यापर्यंत विविध उपक्र्रमाची अंमलबजाणी करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाने यात पुढाकार घेवून जिल्हा परिषद स्तरावर विविध विभागांच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या आवाहनाला साद प्रतिसाद देत कर्मचाºयांनी स्वत:चे टेबलापासून तर स्टोअर रूपपर्यंत कार्यालय झाडून काढली.सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी ते टास्क चॅलेज म्हणून स्विकारत स्वच्छता ही सेवा या अभियानाच्या काळातच अधिकारी कर्मचारी यांचे सेवा विषयक प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला. त्या प्रकरणांची पडताळणी करून स्वच्छता ही सेवा अभियानाच्या काळात २५ सप्टेंबरपर्यंत तब्बल १०८६ प्रकरणे निकाली काढली काढण्यात आली आहेत. प्रकरणाची संख्या ४१० पहिला, दुसरा लाभ मंजूर झालेले प्रकरणाची संख्या २०२, परिविक्षाधीन समाप्ती मंजूर झालेले प्रकरणाची संखया ५२, संगणक परिक्षा पास होण्यापासून सुट प्रकरणाची संख्या ७३, सेवाप्रवोशोत्तर परीक्षा पासून सुट प्रकरणाची संख्या १३, मराठी, हिंदी परिक्षापासून सुट प्रकरणाची संख्या ३२७, वैद्यकीय देयके मंजुर झालेल्या प्रकरणाची संख्या ९ असे १०८६ सेवा विषयक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. अधिकारी कर्मचारी यांचे सेवा विषयक प्रकरणे निकाली काढण्याचे कार्य सामान्य प्रशासन विभागाने संबंधित विभाग प्रमुखांच्या सहायाने वेळेत पूर्ण केले आहे.