मदतीची मागणी : काटेबाम्हणी येथील घटनाउसर्रा : मोहाडी तालुक्यातील ग्राम काटेबाम्हणी येथे दुपारी १.३० वाजता वीज कोसळून घराला आग लागली.याबाबत सविस्तर असे की, काटेबाम्हणी येथील रहिवासी सरस्वता लक्ष्मन मोटघरे यांच्या घरी दुपारी १.३० वाजात वीज कोसळली. यादरम्यान पावसालाही सुरुवात झाली होती. पण विज घरावर कोसळल्याने घराला आग लागली यात घरातील इमारतीचे, छताचे नुकसान झाले. घरातील १५ क्विंटल धान, ४ क्विंटल तांदूळ, ३ क्विंटल गहू, ५० कि.ग्रॅ. तुळीची दाळ, गुरांचा चारा व इतर घरगुती सामान जळून १.५० लाखांची नुकसान झाली असून तलाठी यांनी पंचनामा केला आहे. आकस्मिक मदतीसाठी व आग विझविण्यासाठी तुमसर पोलीसांच्या मदतीने तुमसर नगरपरिषदेची अग्नीशामक दलाला बोलविण्यात आले व आगीवर नियंत्रण करण्यात आले. दरम्यान आमदार चरण वाघमारे, जि.प. सदस्य संदीप ताले, पं.स. सदस्य गुरुदेव भोंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. आमदार चरण वाघमारे यांनी तात्पुरती व्यवस्था म्हणून ताडपत्री भेट दिली. तहसिलदारांकडून जेवठी शासकीय मदत देता येईल तेवढी मदत देणार असल्याचे आ.वाघमारे यांनी सांगितले. (वार्ताहर)
वीज कोसळून घराला आग
By admin | Updated: July 2, 2016 00:30 IST