शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत रोहित्रावर कोसळले झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:42 IST

कोंढा परिसरात दहा दिवसापुर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. त्यामध्ये ५० वर्षाचे सावरीचे झाड वीज रोहित्रावर पडले. परंतु अजूनही वीज पारेषण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी झाडाची विल्हेवाट तसेच तुटलेल्या तारा न उचलल्याने शेतकऱ्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देवीज पुरवठा ठप्प : वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष
<p>लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : कोंढा परिसरात दहा दिवसापुर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. त्यामध्ये ५० वर्षाचे सावरीचे झाड वीज रोहित्रावर पडले. परंतु अजूनही वीज पारेषण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी झाडाची विल्हेवाट तसेच तुटलेल्या तारा न उचलल्याने शेतकऱ्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे.वादळी पावसात झाडे, विजेचे खांब व तारा तुटल्या आहेत. त्या दहा दिवसापासून शेतात पडून आहेत. डॉ. शतरंज गजभिये यांच्या शेतातील बांधावर शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज पुरवठा करण्यासाठी जनित्र ठेवले होते. वादळात जनित्रावर ५० वर्षापुर्वीचे सावरीचे झाड पडले. वीजेच्या तारा तुटल्या खांब शेतात पूर्ण झुकले. तेव्हा कृषीपंपाच्या जोडणीला असलेल्या तारा, खांब तुटल्याने त्याची योग्य विल्हेवाट वीज कर्मचाºयांनी लावणे आवश्यक होते. परंतु दहा दिवसापासून खांब, तारा शेतात पडून आहेत.त्या पूर्ववत करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांची हालचाल दिसत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच जीवंत वीज तारांना स्पर्श होवून मोठा धोका निर्माण होण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तरी कोसळलेल्या सावरीच्या झाडाची तोडून जनित्र सुस्थित लावणे तसचे झुकलेले खांब व तुटलेल्या तारा जोडण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.