शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसराईत बसणार आचारसंहितेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 21:47 IST

लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागू झाली असून याचा फटका एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या लग्नसराईला बसण्याची शक्यता आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सोबत मोठी रक्कम ठेवणे आता डोकेदुखी ठरणार आहे. यासाठी वर-वधू पित्यासह कुटुंबीयांनाही खबरदारी घ्यावी लागणार आहे.

ठळक मुद्देपोलिसांची करडी नजर : वर-वधू पित्यांना होऊ शकतो मनस्ताप

शिवशंकर बावनकुळे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागू झाली असून याचा फटका एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या लग्नसराईला बसण्याची शक्यता आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सोबत मोठी रक्कम ठेवणे आता डोकेदुखी ठरणार आहे. यासाठी वर-वधू पित्यासह कुटुंबीयांनाही खबरदारी घ्यावी लागणार आहे.लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचा कोणत्याही प्रभार भंग होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पथके तैनात केली असून त्यांच्या मार्फत वाहनांची तपासणी होत आहे.आचारसंहितेनुसार ३० हजारांहून अधिक रक्कम सोबत बाळगल्यास त्याबाबतची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी विचारणा केली तर योग्य कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. मात्र कागदपत्रे नसल्यास त्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. योग्य कागदपत्रे नसल्यास रक्कम जमा करण्यात येणार आहे. लग्न सराईचा महिना असून शेतकरी नोकरीवर्ग मुलामुलींचे लग्न करण्यासाठी ग्रामीण भागातून अनेक नागरिक शहरात खरेदीसाठी येताना जवळ मोठ्या प्रमाणात रक्कम आणतात. त्यांनाही फटका बसणार आहे.लग्नात राजकीय नेते उपस्थित राहतील तर खबरदारी घ्यावी लागणार आहे. लग्नासाठी सोने, कपडे, भांडी खरेदीसाठी मोठी रक्कम सोबत घ्यावी लागते. यावेळी आगामी दोन महिने अशी रक्कम बाळगताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. अधिक रक्कम असल्यास बँकेतून काढल्याची पावती सोबत ठेवावी लागणार आहे. सामान्य लग्नाबाबत परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.या निवडणुकीच्या हंगामात वर-वधूपित्यांना मनस्ताप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची कसून चौकशी सुरु आहे. रोख रकमेबाबत मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे.एप्रिल-मे महिन्यात १२ मुहूर्तएप्रिल व मे महिन्यात एकाच वेळी लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि लग्न सराईची झुंबड उडणार आहे. दोन महिन्यात १२ विवाह मुहूर्त आहेत. एप्रिलमध्ये १७, १८, २२, २४, २६, २७ व २८ तर मे महिन्यातसुद्धा काही विवाह मुहूर्त आहेत.महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्यांना फटकामहाराष्ट्रातून परराज्यात ये जा करणारे नागरिक व्यवसायीकांना त्रास सहन करावा लागणार आहे. परिराज्यातील व्यापाºयांच्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. खरेदीसाठी सोबत असलेल्या पैशांबाबत योग्य कागदपत्रे व्यवसायीकांनी सोबत बाळगावी किंवा प्रशासनानी मागितल्यास सादर करावे लागतील.