शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नाकाडोंगरी परिसरातील आठ गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 22:24 IST

तालुक्यातील आष्टी गावठाण फिडर कृषी फिडरला जोडण्यात आल्यामुळे कधी ट्रिपिंग तर कधी भारनियमनाचा फटका बसत असल्यामुळे नाकाडोंगरी परिसरातील आठ गावे मागील सहा महिन्यांपासून अंधारात आहेत.

ठळक मुद्देकृषी फिडरशी जोडले गावठाण फिडर : सहा महिन्यांपासून महावितरणचे दुर्लक्ष

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील आष्टी गावठाण फिडर कृषी फिडरला जोडण्यात आल्यामुळे कधी ट्रिपिंग तर कधी भारनियमनाचा फटका बसत असल्यामुळे नाकाडोंगरी परिसरातील आठ गावे मागील सहा महिन्यांपासून अंधारात आहेत. परंतू महावितरणने उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.तुमसर तालुक्यातील ग्रामीण भागात अघोषीत भारनियमन होणे हे आता नित्याचे झाले आहे. परिणामी ग्रामीण जनता हताश झाली आहे. महावितरणने कृषी व घरगुती वीज धारकांसाठी थ्री फेज व सिंगल फेज योजना अंमलात आणून नवीन गावठान फिडरची स्थापना करून भारनियमनमुक्त करण्यात आले होते.मात्र मागील सहा महिन्यापासून आष्टी गावठान ११ केव्ही फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या फिडर अंतर्गत येणाºया चांदमाराटोली, डोंगरीबुज, टोली, लोभी, आष्टी, नाकाडोंगरी, पाथरी, कवलेवाडा, धुटेरा ही आठ गावे प्रभावित होत आहेत. त्यामुळे महावितरणने गावठान फिडरला कृषी फिडरशी तात्पुरती जोडणी केली व नागरिकांना होणारा त्रास कमी केला. परंतु कृषी फिडरच्या थ्री फेज लाईनवर भारनियमन तर आहेच याशिवाय आठ गावांचा भार वाढल्यामुळे वारंवार लाईट ट्रिप होणे तर कधी अनिश्चित वेळेसाठी लाईट बंद होणे, हा प्रकार सुरू झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना जीव मुठीत जगावे लागत आहे. याप्रकरणी महावितरणकडे मागील सहा महिन्यांपासून अनेकदा लेखी तक्रारी वरिष्ठ अधिकाºयांना केल्या. परंतु महावितरणने अद्याप लक्ष न दिल्यामुळे नागरिकांच्या समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांची आता सहनशिलता संपली असल्यामुळे असंतोष खदखदत आहे.याप्रकरणाचे गांभीर्य ओळखून महावितरणने समस्येचे निराकरण करणे गरजेचे आहे. याबाबत गोबरवाही उपविभागाचे कनिष्ठ अभियंता अरविंद पंधरे यांच्या भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.