शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आठ प्रकल्प तुडूंब

By admin | Updated: August 6, 2014 23:40 IST

जिल्ह्यासह मध्य प्रदेशात बरसत असलेल्या संततधार पावसामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर सातत्याने वाढत आहे. जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांत ४९ टक्के जलसाठा असून यापैकी चार माजी मालगुजारी तलाव,

भंडारा : जिल्ह्यासह मध्य प्रदेशात बरसत असलेल्या संततधार पावसामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर सातत्याने वाढत आहे. जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांत ४९ टक्के जलसाठा असून यापैकी चार माजी मालगुजारी तलाव, एक मध्यम प्रकल्प तर ४ लघु प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. मध्यम प्रकल्पात पाण्याची सरासरी टक्केवारी ४१.२६ आहे.जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा साठा दिवसेंगणिक वाढत आहे़ जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पांत सरासरी ४९ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ मागील हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात ३७ टक्क्यांनी घट असल्याचे दिसून येते. मागील वर्षी याच दिवशी ही टक्केवारी ८६.९२ इतकी होती.लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी २६.०९, बघेडा १००, बेटेकर बोथली ६६.२३ आणि सोरणा जलाशयात उपयुक्त जलसाठा ५५.२५ टक्के आहे़३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ५०.५१ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ५८.०९ टक्के आहे़ ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. आमगाव, पाथरी, लवारी, सितेपार हे मालगुजारी तलाव शंभर टक्के भरले आहेत. तसेच वाकल, परसवाडा, डोंगरला, नागठाणा, टांगा हे लघल प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे़ आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यात संततधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्याने पाणी सोडण्यात आले होते. यामुळे वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांना पूर आला होता. सध्या जिल्हा प्रशासनाने काल ढगफुटीच्या संभाव्य धोक्यामुळे नदीकाठावरील गावांना धोक्याची पूर्वसूचना दिली होती.