शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

नोकरीचे आमिष दाखवून आठ लाखांनी गंडविले

By admin | Updated: June 28, 2014 00:54 IST

नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवित बेरोजगार तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांना हेरून लाखांदूर तालुक्यातील एका ठगबाजाने आ िलाखांहून अधिक रूपयांनी गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

लाखांदूर : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवित बेरोजगार तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांना हेरून लाखांदूर तालुक्यातील एका ठगबाजाने आ िलाखांहून अधिक रूपयांनी गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने फसवणूक झालेल्या तरुणांनी नागपूरचे पोलीस आयुक्तांकडे न्यायासाठी धाव घेतली आहे.लाखांदूर तालुक्यातील मुर्झा (पारडी) येथील राहुल पंचम शहारे असे या ठगबाजाचे नाव आहे. गौतम साखरे रा.वडेगाव जि.गोंदिया याला त्याने पहिल्यांदा ४१ हजाराने गंडविले. आॅर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याने गौतम साखरे यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यासाठी सांगितले. मुलाखतीचे बनावट कॉल लेटर, आणि नियुक्ती आदेश त्याने दिले. कृपासागर जनबंधू रा.शेंडा जि.गोंदिया यांना त्याने गंडविले. राहुलची बहीण शिल्पा राऊत ही जनबंधू यांच्याकडे भाड्याने राहायची. बहिनीकडे सतत येणाऱ्या राहुलने आपण आॅर्डनन्स फॅक्टरी, भंडारा येथे डाटा एन्ट्री आॅपरेटर पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. त्यानंतर ओळखीमुळे कृपासागर जनबंधू यांची मुलगी संजीवनी बी.ए.बी.एड. हिला बोरकर नामक अधिकाऱ्यामार्फत आॅर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे स्टोअर किपर पदावर नोकरी लावून देण्याचे आमीष दाखविले. यासाठी त्याने जनबंधू यांच्याकडून पैसे घेत १ लाख २० हजाराने गंडा घातला. या ठगबाजाने जनबंधू याच्या मुलीलाही याच प्रकारे बोगस कॉल लेटर पाठविले होते. त्या कॉललेटरवर संशय बळावल्यामुळे जनबंधू यांनी भंडारा आॅर्डनन्स फॅक्टरी येथे चौकशी केली असता बिंग फुटले.मुर्झा पारडी येथे घराशेजारील गिरधारी श्रीराम उके याची ४ लाख ४० हजार रूपयाने फसवणूक केली. गायी व शेळीपालन व्यवसायासाठी कर्ज प्रकरण मंजूर करण्याचे सांगून राहुलने त्यांच्याकडून ४० हजार रूपये लाटले. त्यानंतर उके यांच्या मुलाला पुणे येथील समाजकल्याण विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ४ लाखाने गंडविले. नोकरीसाठी उके यांनी घरचे सोने गहाण ठेऊन, धान्य विकून आणि हातउसणवारी करून ही रक्कम त्याला दिली होती. १ लाख २० हजारांनी फसवणूक झालेले कृपासागर जनबंधू व ४१ हजाराने लुबाडणूक झालेले गौतम साखरे यांनी मुर्झा येथील तंटामुक्त समितीकडे तक्रार केली असता तेथे सुखदेव शंकर टेंभुर्णे रा.मुर्झा, रंजना टेंभुर्णे रा.मांढळ, रजनी वालदे रा.गोरेगाव यांच्याही तक्रारी दिसून आल्या. या तिघांनाही त्याने अनुक्रमे ३५ हजार, २५ हजार आणि १ लाख ५० हजार रूपयाने फसवणूक केल्याचे उघडकीस आले. या पाचही जणांना शहारेने ८ लाख ११ हजार रूपयाने गंडा घातला आहे. नोकरीचे आमिष देताना त्याने अधिकाऱ्यांच्या पदांचा व नावांचा वापर केला असून वेगवेगळ्या भ्रमणध्वनीवरून बोलणे करून द्यायचे. फसवणुकीच्या या गोरखधंदात शहारे याच्यासोबत आणखी काही लोकांचा सहभाग असून या रॅकेटचे धागेदोरे पसरले आहे. संबंधितांना दिलेल्या बोगस कॉल लेटर आणि नियुक्ती पत्रात त्याने आॅर्डनन्स फॅक्टरीचे महाव्यवस्थापक के.एम. कालानी, श्रीमती सनी, एम.के. खंडाळे, एस.के नाफरी अशा अधिकाऱ्यांच्या नावाने स्वाक्षऱ्या केल्याचेही दिसून आले.दरम्यान संबंधितांकडून आपण मोठ्या रकमा घेतल्याचे मान्य करीत १० नोव्हेंबर २०१३ पर्यंत पैसे परत करण्याची हमी राहुल शहारे याने मुर्झा येथील तंटामुक्त समितीसमोर लेखी स्वरूपात दिली होती. परंतू कालावधी उलटूनही त्याने पैसे परत केले नाही. फसवणूक झालेल्यांनी दिघोरी, लाखांदूर पोलीस ठाण्यासह पोलीस अधिक्षक यांच्याकडेही तक्रारी नोंदविल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)