शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराच्या हल्ल्यात आठ शेतमजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:44 IST

शेतात धानाची रोवणी करतांना रानडुकराने केलेल्या हल्ल्यात आठ मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील हसारा शिवारात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. जखमींमध्ये सहा महिला मजुरांचा समावेश असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

ठळक मुद्देहसारा शिवारातील घटना : सहा महिलांचा समावेश, दोघांची प्रकृती गंभीर
<p>लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शेतात धानाची रोवणी करतांना रानडुकराने केलेल्या हल्ल्यात आठ मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील हसारा शिवारात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. जखमींमध्ये सहा महिला मजुरांचा समावेश असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.उत्तम ठवकर (७०) रा. काटेब्राम्हणी, विलास अतकरी (३५) रा. टाकला, कमलाबाई नेवारे (६०), कलाबाई गभणे (५२), बबीता बावनकर (३८) रा. शिवनगर तुमसर अशी जखमींची नावे आहेत. तर तिघे किरकोळ जखमी आहेत. जिल्ह्यात सध्या रोवणीचे काम वेगात सुरु आहे. तालुक्यातील हसारा शिवारातील भैय्यालाल बघेले यांच्या शेतात रोवणीचे काम सुरु होते. १० ते १५ मजूर काम करीत होते. दुपारी १ वाजता च्या सुमारास अचानक पिसाळलेले रानडुकर शेतात शिरले. रानडुकराला पाहून सर्व मजूर पळू लागले. परतु वृध्द असलेल्या उत्तम ठवकर यांना पळता आले नाही. त्यामुळे रानडुकराने त्याला फरफटत नेले. हा प्रकार पाहून विलास अतकरी मदतीला धावून आला. मात्र, रानडुकराने त्याच्यावरही हल्ला केला. यानंतर झालेल्या आरडाओरडीने रानडुकर दुसऱ्या शेतात शिरला. त्याठिकाणी असलेल्या महिला मजुरांवर त्याने हल्ला केला यात कमलाबाईचा पायाला जब्बर चावा घेतला तर कलाबाईचा हात जखमी झाला. बबीताच्या कमरेला मार लागला. हा प्रकार पाहून एकच गोंधळ उडाला होता. यानंतर गावकºयांनी गंभीर जखमींना भंडाराच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या उत्तम ठवकर व विलास अतकरी यांच्यावर भंडारा येथे उपचार सुरु आहे.वनविभागाचे दुर्लक्षहसारा परिसरात गत काही दिवसांपासून रानडुकरांचा मुक्त संचार सुरु आहे. यामुळे मजुरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वनविभागाला सुचना देवून रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. परंतु वनविभागाने याकडे दुर्लक्ष केले आणि आज ही घटना घडली. सर्व जखमींना तात्काळ शासकीय मदत द्यावी अशी मागणी होत आहे.