शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात
2
रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
3
महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय
4
विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या
5
बेकायदा लाऊडस्पीकर रोखल्याचा दावा; सरकारवर अवमानाची कारवाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
7
लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
8
संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
9
‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 
10
टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार
11
कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

सर्वधर्मिय विवाह सोहळ्यात आठ जोडपी विवाहबद्ध

By admin | Updated: April 5, 2015 00:47 IST

विदर्भात घोड्याची यात्रा म्हणून प्रख्यात असलेल्या अड्याळ येथील यात्रा महोत्सवात सर्वधर्मिय विवाह सोहळ्यात सर्वधर्मिय आठ जोडपी विवाहबद्ध झाले.

घोडायात्रेची सांगता : लाखो भाविकांनी घेतले अड्याळच्या हनुमंताचे दर्शनअड्याळ : विदर्भात घोड्याची यात्रा म्हणून प्रख्यात असलेल्या अड्याळ येथील यात्रा महोत्सवात सर्वधर्मिय विवाह सोहळ्यात सर्वधर्मिय आठ जोडपी विवाहबद्ध झाले. घोडायात्रेच्या निमित्ताने २८ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री बालाजी रथयात्रा श्रीमद भागवत सप्ताह श्रीरामनवमी उत्सव हनुमान जयंती उत्सव यासह अन्य कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. या वैशिष्टपूर्ण घोडायात्रेला संपूर्ण विदर्भातील लाखो भाविकांनी येथील जागृत हनुमंताचे दर्शन घेतले. या यात्रेचा भाग म्हणून अड्याळ येथे १९९६ पासून विवाह सोहळ्याची परंपरा वाजत गाजत सुरू असून गेल्या १९ वे वर्षापासून ग्रामविकास एकात्मता समितीच्या वतीने आजपर्यंत ३४० जोडपे विवाह बंधनात अडकले.विवाह सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार रामचंद्र अवसरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नाना पटोले, डॉ. हेमकृष्ण कापगते, दुध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, जिल्हा परिषद सदस्य युवराज वासनिक, उपसभापती शिवशंकर मुंगाटे, डॉ.भैय्यामोहन क्षिरसागर, हनुमान मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्करराव पोटवार, मधुकर निकुरे, देविदास नगरे उपस्थित होते. संचालन प्रा. ईश्वर खंडाईत, आभारप्रदर्शन धनंजय मुलकलवार यांनी केले. यावेळी उपस्थित अतिथींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विवाह सोहळ्यातील नवदांपत्यांना ग्रामपंचायत, अड्याळ पोलीस ठाणे, हनुमान मंदिर समितीकडून सहउपयोगी भेटवस्तू देण्यात आलेत. यावेळी किशोर देवयीकर महाराज, अशोक सलुजा, सुर्ववंशी महाराज व बुद्ध वंदना मुनेश्वर बोदलकर यांनी वाचन केले. या सात दिवस चालणाऱ्या महायज्ञात हभप अनिल अहेर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन या सप्ताहात पर्वनी ठरली. तसेच सातही दिवस हनुमान मंदिरात महिला मंडळातर्फे सुंदरकांड, ग्रामसफाई, भजन जागरण, काकड आरती, हरिपाठ, घटस्थापना इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)