संदीप ताले : २ कोटीच्या निधीमुळे विकासाला हातभारलोकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : लोकांच्या सेवेसाठी मी सर्वपरी तत्पर असून माझ्या जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्या निराकरण करून त्या मार्गी लावण्यासाठी मी कसोसीने प्रयत्नरत असून त्या प्रयत्नांची फलश्रूती म्हणजे मागील सात वर्षापासून आंबागड जिल्हा परिषद क्षेत्रात विविध कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. परंतु विकास ही निरंतर प्रक्रिया असल्याने राहिल्या समस्या मार्गी लावण्यासाठी २ कोटीची विकास कामे मंजूर केली असून शेवटपर्यंत आंबागड जिल्हा परिषद क्षेत्राचा सर्वांगिण विकास करणे हेच माझे अंतिम ध्येय असल्याचे जिल्हा परिषद सदस्य संदीप ताले यांनी आंबागड जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले. तुमसर तालुक्यातील जि.प. आंबागड येथे विविध विकास कामांचे भूमि पूजन आमदार चरण वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य संदीप ताले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य गुरुदेव भोंडे, पंचायत समिती सदस्या रेखा धुर्वे, पवनारा सरपंच मुकेश भांबोरे, बपेरा सरपंच बबिता भिवगडे, आंबागड दयवंती धुर्वे, उपसरपंच सुनिल टेंभरे, ग्रामपंचायत सदस्य धर्मेंद्र इळपाचे, राजेश कुंभरे, पिटेसूर सरपंच कल्पना रामटेके, लेंडेझरी सरपंच दुर्गा उईके, उपसरपंच देवराम मडावी, आलेसूर सरपंच गोपीका मेहर, उपसरपंच संजय इळपाचे, रोंघा सरपंच विजय परतेती, उपसरपंच देवराम भोंडे, लंजेरा सरपंच ग्यानीराम शेंडे, उपसरपंच सुधीर डोंगरे, लोहारा सरपंच शामराव ठाकरे, ग्रा.पं. सदस्य सुरेंद्र भोंडे, अंकुश राऊत, राष्ट्रपाल राऊत, सामाजिक कार्यकर्ता तनू साधवानी, अनिल बांडेबुचे, परिसरातील गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार चरण वाघमारे यांनी सूचविलेल्या २५१५ व जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून आंबागड जिल्हा परिषद क्षेत्रात विकास कामे पवनारा येथे कृषी विभागांतर्गत साठवण बंधारा सभामंडप आणि रस्ता खडीकरण बांधकाम आंबागड येथे सभामंडप बांधकाम, रामपूर बपेरा रोडवर रपटा बांधकाम व सिमेंट रस्ता, गायमुख लेंडेझरी गोवारीटोला येथे सभामंडपाचे बांधकाम, मंडेकसा येथे साठवण बंधाऱ्याचे बांधकाम, खापा रोंघा खडीकरण खापा येथे सार्वजनिक वाचनालय इमारत बांधकाम, लोहारा धोप रस्त्याचे डांबरीकरण, आंबागड गायमुख डांबर रस्त्याचे दुरुस्तीकरण व जिल्हा परिषद अंतर्गत विशेष दुरुस्ती विविध सात विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य संदीप ताले यांच्या हस्ते करण्यात आले. विकास कामे होत असल्याने परिसरामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.बसथांब्यानजीक सुविधांचा अभावलाखनी : समर्थनगर येथील बस स्थांब्याशेजारी शौचालयाची सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यासंबधी अनेकदा जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन व राज्य परीवहन महामंडळाला निवेदने देण्यात आली. मात्र समस्या सोडविण्याकडे कानाडोळा करण्यात आला. त्यामुळे समस्या कधी सुटणार, असा सवाल प्रवाशांनी केला आहे.
आंबागड क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 00:20 IST