शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By admin | Updated: December 20, 2014 22:33 IST

प्रत्येक विद्यार्थ्यांला शिक्षण मिळावे यासाठी शासनाने विविध उपक्रम राबवून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. मात्र हे करत असताना प्रत्येक शाळेत शिक्षकांची पदे

साकोली : प्रत्येक विद्यार्थ्यांला शिक्षण मिळावे यासाठी शासनाने विविध उपक्रम राबवून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. मात्र हे करत असताना प्रत्येक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत, याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. साकोली तालुक्यात एका मुख्याध्यापकासह १२ शिक्षक कमी आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाला कसरत करावी लागत आहे.पंचायत समिती साकोली अंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागामार्फत तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेचा कारभार चालतो. तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ९६ व हायस्कुलच्या तीन शाळा आहेत. यात वर्ग १ ते ५ मध्ये ८ हजार ६८५ विद्यार्थी तर वर्ग ६ ते ८ मध्ये ६ हजार १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यासाठी शासनाने पदवीधर शिक्षकांची तालुक्यासाठी ६२ पदे मंजूर केली. यापैकी ५४ पदवीधर शिक्षक कार्यरत आहेत. तर ८ पदवीधर शिक्षक कमी आहेत. सहाय्यक शिक्षकांची २७८ पदे मंजूर असून सध्या तालुक्यात २७४ शिक्षक कार्यरत आहेत. तर चार सहाय्यक शिक्षक कमी आहेत. उच्च श्रेणी मुख्याध्यापकाचे १९ पदे मंजूर असून सध्या १८ कार्यरत आहेत. त्यापैकी एक मुख्याध्यापक कमी आहे. असे १३ शिक्षक साकोली तालुक्यात कमी आहेत. यासाठी गटशिक्षणाधिकारी यांनी वारंवार शिक्षणाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला. मात्र शिक्षकांची रिक्त पदांची पूर्तता झालेली नाही.शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून वर्षाला हजारोंचा खर्च करण्यात येतो. यात विद्यार्थ्याना मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश, मध्यान्ह भोजन यासारख्या सोयी पुरविल्या. मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, कामचुकारपणा, नियोजनाचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांवर संकट ओढावत आहे. साकोली तालुक्यातील वांगी, बोंडे व वडद या शाळेत शिक्षकांच्या मागणीसाठी चारवेळा शाळा बंद आंदोलन केले. त्यानंतर शिक्षण विभागाने तात्पुरती सोय म्हणून दुसऱ्या शाळेतील शिक्षकांना पाठवून केली. (तालुका प्रतिनिधी)