शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण सेवा संवर्गाची परीक्षा अखेर स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 14:17 IST

सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील (शिक्षण सेवा) प्राचार्य आणि अधिव्याख्याता पदाची विभागीय परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे.

ठळक मुद्देएमपीएससीचा निर्णय निवडणूक काळात होती प्राचार्य व अधिव्याख्याता पदांची परीक्षा

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील (शिक्षण सेवा) प्राचार्य आणि अधिव्याख्याता पदाची विभागीय परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. लोकसभा निवडणूक काळात आयोजित या परीक्षेसंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. आता निवडणूक कामात व्यस्त परीक्षार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र शिक्षण सेवा ( शिक्षण सक्षमीकरण) या संवर्गातील प्राचार्य (गट-अ), ज्येष्ठ अधिव्याख्याता (गट-अ) आणि अधिव्याख्याता (गट-ब) या पदांसाठी विभागीय परीक्षा मुंबई येथे ३० व ३१ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यासंबंधीचे आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्गमित केले होते. या परीक्षेसाठी राज्यातील ३२४ प्राचार्य आणि अधिव्याख्याता पात्र ठरले होते. त्यापैकी अनेकांची लोकसभा निवडणूक कामासाठी नियुक्ती झाली आहे. झोनल ऑफिसर तथा मतदान केंद्राध्यक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणूक प्रशिक्षण आणि विभागीय परीक्षेचा ताण अश्या अवस्थेत पात्र प्राचार्य आणि अधिव्याख्याते सापडले होते. त्यातच मार्च एंडिगमुळे आर्थिक लेखाजोखाचे कामही त्यांच्यापुढे आहे. अश्या परिस्थितीत परीक्षा द्यायची कशी, असा प्रश्न सर्वांना पडला होता.या परीक्षेसंदर्भात ‘लोकमत’ने २६ मार्च रोजी ‘निवडणूक काळात शिक्षण सेवा संवर्गातील प्राचार्य व अधिव्याख्यातांची परीक्षा’ असे वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत राज्य लोकसेवा आयोगाने ही परीक्षा आता स्थगित करण्याचा निर्णय घेताला आहे. तसेच पत्र आयोगाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. त्यात सदर परीक्षा आयोजित करताना येणाऱ्या संभाव्य प्रशासकीय अडचणींचा विचार करता विभागीय परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले आहे. तसचे या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे त्यात नमूद आहे.

टॅग्स :Governmentसरकारexamपरीक्षा