शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
2
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
3
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
4
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
5
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
6
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
7
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
8
पावसाचं थैमान! गाझियाबादमध्ये एसीपी ऑफिसचं छत कोसळलं, ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
9
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
10
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
11
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
12
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
13
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
14
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
15
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
16
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
17
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
18
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
19
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
20
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत

शिक्षण गरिबीवर मात करणारे अस्त्र

By admin | Updated: February 3, 2017 00:45 IST

शालेय परिसरात अनुशासन हे सर्वोपरी समाज व शिक्षण कार्य करतांना लागतो. हे सर्व थरातील विद्यार्थी,

पुराम यांचे प्रतिपादन : ग्रामविकास महाविद्यालय कोंढी येथे स्नेहसंमेलनाचे उद्घाटनजवाहरनगर : शालेय परिसरात अनुशासन हे सर्वोपरी समाज व शिक्षण कार्य करतांना लागतो. हे सर्व थरातील विद्यार्थी, पालकांमध्ये असणे काळाची गरज आहे. विज्ञान युग निर्माण करणे हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे. शिक्षणाने भविष्य उज्ज्वल करा. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी असणे आवश्यक आहे. किंबहुना शिक्षण हे गरीबीवर मात करणारे अस्त्रे आहे, असे प्रतिपादन गोंदिया जिल्ह्याचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी आर.एल. पुराम यांनी केले.ग्रामविकास कॉन्व्हेंट, पूर्व माध्यमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय कोंढी जवाहरनगरचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रसंगी उपमुख्य कार्यपालन अधिकारी आर.पुराम बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ.चंद्रमोहन गुप्ता होते. यावेळी संस्थापक वासुदेवराव गजभिये, पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, संस्था सचिव रामकुमार गजभिये, मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के. सी. शहारे, डॉ. लांजेवार, नाना कारेमोरे, दादा कातोरे, मन्साराम कारेमोरे, मुख्याध्यापक हातझाडे, सरपंच माया वासनिक, आदर्श शिक्षक पुरस्कृत प्राचार्य एम.एम. मेश्राम, मुख्याध्यापक पी.एस. नागदेवे, पर्यवेक्षक एस.एस. शेंदरे उपस्थित होते. वासुदेवराव गजभिये म्हणाले,, आई वडील व गुरुजनांची शिकवण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी, त्यांचे आदर्श मनाशी बाळगून विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करा व उज्वल भविष्य घडवा. शिक्षकांनी स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालनाद्वारे यातूनच आजचा विद्यार्थी उद्याचा भावि अधिकारी तयार होईल. संदीप ताराम म्हणाले , विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करावे, वाम मार्गाचा करू अवलंब करू नये, वाईट पेंशनापासून अलिप्त राहावे, तत्पपूर्वी एम.सी.सी.च्या विद्यार्थ्यांकडून उपस्थित पाहुण्यांना मानवंदना बहाल करण्यात आली. याप्रसंगी नृत्य सादरीकरण करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्या एम.एम. मेश्राम यांनी केले. संचालन शिलवंतकुमार मडामे यांनी केले. आभार मुख्याध्यापक पी.एफ. नागदेवे यांनी केले. (वार्ताहर)