शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘लेटलतीफ’ १० कर्मचाऱ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2017 00:14 IST

जिल्हा परिषद प्रशासनात अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याची बाब नेहमीचा चर्चेचा विषय आहे.

शिक्षण विभागातील प्रकार : कारवाईच्या भीतीने कर्मचारी धास्तावलेभंडारा : जिल्हा परिषद प्रशासनात अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याची बाब नेहमीचा चर्चेचा विषय आहे. वचक नसल्याने कर्मचारी कर्तव्यावर वेळेवर पोहचत नाही. मात्र शिक्षण विभागातील ‘लेटलतीफ’ दहा कर्मचाऱ्यांना नव्यानेच रुजू झालेले शिक्षणाधिकारी (प्राथ.) रविकांत देशपांडे यांनी नोटीस बजावले आहे. यामुळे शिक्षण विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद इमारतीतून शिक्षण विभागाचा कारभार चालतो. मागील काही वर्षांपासून येथे नियमित शिक्षणाधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांचे फावत आहे. नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणाने शिक्षण विभाग चर्चेत राहत आहे. नियमित शिक्षणाधिकारी नसल्याने प्रभारींवर येथील प्राथमिक शिक्षण विभागाचा कार्यभार सुरु होता. मात्र येथे नियमित शिक्षणाधिकारी म्हणून शासनाने रविकांत देशपांडे यांना भंडारा येथे पाठविले आहे. देशपांडे हे २७ जानेवारी भंडारा येथे रुजू झाले. सोमवारला त्यांनी सकाळी कार्यालय गाठले. दिवसभर त्यांनी कार्यालयीन कामाचे अवलोकन केले व अधिनस्थ कर्मचाऱ्यांची बैठक घेवून त्यांना कामे तातडीने करण्याच्या सुचना दिल्या. मंगळवारला देशपांडे हे कार्यालयामध्ये सकाळी ९.४५ वाजताच दाखल झाले. शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यालयात येण्याची वेळ ही १० वाजताची आहे. मात्र शिक्षण विभागातील अनेक कर्मचारी हे वेळ चुकूनही उपस्थित झाले नाही. त्यामुळे देशपांडे यांनी येथील ‘लेटलतीफ’ महिला अधिक्षकासह दहा कर्मचाऱ्यांना तातडीने उशिरा येण्याचे कारण दाखवा नोटीस बजावले. यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली.दरम्यान दहाही लेटलतीफ कर्मचाऱ्यांनी नोटीस मिळताच ताबडतोब त्याचे उत्तर शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. आज बुधवारला शिक्षण विभागातील नेहमीचेच ‘लेटलतीफ’ कर्मचारी कालच्या नोटीस मुळे आज वेळेवर कार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्यालयात हजर झाले. नव्याने रुजू झालेल्या शिक्षणाधिकाऱ्यानी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्याने ही शिस्त सदोदित रहावी अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागली आहे. (शहर प्रतिनिधी)शासन नियमानुसार व चाकोरीत राहून सर्व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यपालन करावे. कार्यालयात येण्याची वेळ ठरवून दिलेली आहे. मात्र याला फाटा देत अनेक कर्मचारी उशिरा येत असल्याने कामाचा खोळंबा होतो. यामुळे उशिरा आलेल्या दहा कर्मचाऱ्यांना पत्र देऊन त्याचे स्पष्टीकरण मागितले. - रविकांत देशपांडे, शिक्षणाधिकारी, (प्राथ.) भंडारा.