शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण समिती सरसावली

By admin | Updated: August 11, 2014 23:41 IST

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, सोबतच गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने गुणवत्ता विकास शिक्षण आराखडा तयार केला आहे.

भंडारा : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, सोबतच गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने गुणवत्ता विकास शिक्षण आराखडा तयार केला आहे. वर्षभरात गुणवत्ता वाढली तर संबंधित शिक्षकांची वाढीव वेतनश्रेणी सुरू ठेवायची अन्यथा वेतनश्रेणी कमी करायची, असा धाडसी निर्णय घेतला आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले आहे. गळतीचे हे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने पुढाकार घेऊन गुणवत्ता विकास शिक्षण आराखडा तयार केला आहे. राज्य शासनानेही या प्रकारचा आदेश निर्गमित केला होता, परंतु शिक्षकांची चूक मुख्याध्यापक दडपायचा, मुख्याध्यापकांची चूक केंद्रप्रमुख, केंद्रप्रमुखाची चूक विस्तार अधिकारी, विस्तार अधिकाऱ्याची चूक गटशिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्याची चूक शिक्षणाधिकारी दडपायचे, असा एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न होता. परंतु आता या निर्णयानुसार तसे होणार नाही.अशी राहील समितीप्रत्येक तालुकास्तरावर केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांची एक समिती तयार करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर सेवानिवृत्त शिक्षक, अनुभवी शिक्षक, शिक्षणाधिकारी यांची समिती गठित केली आहे. तालुकास्तरावरची समिती महिन्याकाठी २० शाळांची पाहणी करतील. असे सात तालुक्यातून महिन्याकाठी १४० शाळांच्या पाहणीचा अहवाल तालुका समिती जिल्हा समितीकडे सादर करतील. अशी होईल कारवाईशाळांची गुणवत्ता तीन महिन्यात तपासण्यात येणार आहे. ७० टक्के गुणवत्ता असेल तर ती शाळा समाधानकारक गटात राहील. ६० टक्क्यांपेक्षा कमी गुणवत्ता असेल तर एक इन्क्रीमेंट कमी, ५० च्या कमी असेल तर दोन इन्क्रीमेंट, ४० च्या कमी असेल तर तीन इन्क्रीमेंट कमी, ३० च्या कमी असेल तर चार इन्क्रीमेंट कमी करण्यात येणार आहे. याशिवाय ज्या शिक्षकांनी मेहनत घेऊन गुणवत्ता वाढविली असेल तर त्या शिक्षकांची वेतनश्रेणी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.निष्पक्ष अहवालाची अपेक्षागुणवत्ता तपासणीचा अहवाल तालुका समितीने योग्य तो अहवाल देणे बंधनकारक राहील. चुकीचा अहवाल दिल्यास त्या समितीतील केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे निष्पक्ष अहवाल देण्याची अपेक्षा शिक्षण समितीने केली आहे.असे राहील पुरस्कारजे शिक्षक व शाळांनी तीन महिन्यात गुणवत्ता वाढविली त्यांच्यासाठी ‘माझी मुले - माझी शाळा’ या उपक्रमातंर्गत १० लाख रुपयांच्या निधीची तरतुद जिल्हा निधीतून करण्यात आली आहे. या निधीतून विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढीसाठी उत्त्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक आणि संबंधित शाळांना पुरस्कार देण्यात येतील. (जिल्हा प्रतिनिधी)