शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दच्या पाण्यावर इकॉर्नियाचा थर

By admin | Updated: November 1, 2016 00:34 IST

तालुक्यात पर्यटकांसाठी पर्वनी असलेल्या गोसेखुर्द व उमरेड कऱ्हांडला अभयारण्याकडे सुट्यांमध्ये पर्यटकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे.

दूषित पाण्याचा फटका : पर्यटकात नाराजीचा सूरअशोक पारधी पवनीतालुक्यात पर्यटकांसाठी पर्वनी असलेल्या गोसेखुर्द व उमरेड कऱ्हांडला अभयारण्याकडे सुट्यांमध्ये पर्यटकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे. गोसेखुर्दच्या काळ्याभोर दिसणाऱ्या पाण्यावर इकॉर्निया वनस्पतीचा थर प्रचंड प्रमाणात वाढल्याने धरणाचे सौंदर्य काहीसे लुप्त होत आहे. त्यामुळे पर्यटकात नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे पर्यटकांचे आकर्षण ठरलेला जय दिसेनासा झाल्याने पर्यटनासाठी सुरू झालेल्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याकडे सुद्धा पर्यटकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे.नाग नदीचे दूषित पाण्यामुळे चर्चेत असलेल्या गोसेखुर्द प्रकल्प हल्ली इकॉर्निया वनस्पतीच्या दूरवर पसरलेला थरामुळे पर्यटकांत चर्चा होवू लागली आहे. हिरव्या वनस्पतीच्या थरामुळे प्रकल्पातील पाणीसाठा बऱ्याच अंतरापर्यंत झाकलेला आहे. त्यामुळे काळ्याभोर पाण्यावर हवेच्या वाहन्यामुळे निर्माण होणारे तरंग व लाटा पर्यटकांना पहायला मिळत नाही. त्यामुळे पर्यटकांत नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यामधून जागतिक किर्ती मिळालेला जय नावाचा वाघ दिसेनासा झाला तेव्हापासून अभयारण्याच्या पवनी गेटवर पर्यटक फिरकताना दिसत नाही. व्यवसाय मिळावा या हेतूने बेरोजगार युवकांनी जिप्सी खरेदी केलेल्या आहेत. परंतु पर्यटकांनी अभयारण्याकडे पाठ फिरविल्यामुळे विभागाचे तर नुकसान होणारच परंतु बेरोजगार युवकांना फार मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. गोसेखुर्द मधील इकॉर्निया निर्मूलन करण्यासाठी सिंचन विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होवू लागली आहे.