शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसानंतर नोंदविले बयाण

By admin | Updated: June 21, 2017 00:25 IST

कर्जबाजारीमुळे आत्मदहन केलेल्या जांभोरा येथील ताराचंद्र शेंदरे यांच्या मृत्यूला चार दिवस लोटल्यानंतर करडी पोलिसांनी मंगळवारला त्यांचा मुलगा मुलचंद शेंदरे यांचे बयाण नोंदविले.

लोकमतचा दणका : जांभोरा येथील शेतकरी आत्मदहन प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : कर्जबाजारीमुळे आत्मदहन केलेल्या जांभोरा येथील ताराचंद्र शेंदरे यांच्या मृत्यूला चार दिवस लोटल्यानंतर करडी पोलिसांनी मंगळवारला त्यांचा मुलगा मुलचंद शेंदरे यांचे बयाण नोंदविले. लोकमतने सातत्याने सदर प्रकरण उचलून शेतकरी आत्महत्या लपविण्याचा हा प्रकार असल्याचे दाखवून दिले. माहितीनुसार, आज करडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुकाराम कोयंडे, बिट अमलदार आसाराम नंदेश्वर हे जांभोरा येथे मुलचंद शेंदरे यांच्या घरी त्यांचे बयाण नोंदविण्यासाठी गेले. यात त्यांनी मुलचंद यांनी सांगितलेल्या घटनाक्रमाची माहिती नोंद करून घेतली. १६ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास एलकाझरी शेतशिवारात ताराचंद शेंदरे यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होता. प्राथमिक तपासाअंती ताराचंद शेंदरे यांनी तणसीच्या ढिगाऱ्यावर स्वत:ला कर्जबाजारीपणाच्या चिंतेतून जाळून घेतले होते .यावेळी घटनास्थळावर चपला, पाण्याची बॉटल, कानखोरना आदी साहित्य एका बाजूला आढळून आले होते. मात्र पोलीस ठाण्यात धुऱ्यावर लागलेल्या आगीमुळे ताराचंद शेंदरे यांचा मृत्यू झाला, अशी नोंद त्यावेळी करण्यात आली होती. मात्र मुलचंद शेंदरे यांनी तसा बयाण दिले नसल्याची बाब उघडकीस आल्यानंतर लोकमतने सदर प्रकरण उचलून धरले. या प्रकरणाची राज्य पातळीवर दखल घेऊन लोकप्रतिनिधींनी जांभोऱ्यात जाऊन शेंदरे कुटुंबियांचीही भेट घेतली. दरम्यान आज शासनातर्फे जिल्हाधिकारी दिवसे यांनी तुमसरचे उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले व भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांच्या नेतृत्वात समिती गठीत करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळण्याच्या हेतूने प्रस्ताव सादर करण्याबाबतचा अहवालासाठी चौकशीचे आदेश दिले.उत्तरीय तपासणीचा अहवाल, पोलिसांचा तपास व मृतक ताराचंद शेंदरे यांच्यावरील कर्जाची माहिती तसेच अन्य बाबी विचारात घेऊन याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल. -शिल्पा सोनुले, उपविभागीय अधिकारी तुमसरमंगळवारला मृतक शेतकरी ताराचंद शेंदरे यांचा मुलगा मुलचंद शेंदरे यांचे बयाण नोंदविण्यात आले आहे. पुढील तपास सुरु आहे.- तुकाराम कोयंडे, पोलीस निरीक्षक करडी.