शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक तालुक्यात होणार जनता दरबार

By admin | Updated: February 6, 2017 00:21 IST

सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेण्यात येणार असून ...

पत्रपरिषदेत नाना पटोलेंची माहिती : भेलबाबत व्यवस्थापकीय संचालकांना पत्र भंडारा : सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेण्यात येणार असून यात जिल्हा व तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती खा.नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनिल मेंढे, नगरसेवक नितीन धकाते उपस्थित होते. खा. पटोले म्हणाले, दोन्ही जिल्ह्यातील सामान्य जनता व शेतकरी यांच्या अनेक समस्या आहेत. त्यांच्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. परंतु त्यांना त्यांचा लाभ घेता येत नाही. यासाठी त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा, त्यांच्या समस्या स्थानिक पातळीवरच सोडविता याव्या, यासाठी हा जनता दरबार घेण्यात येणार आहे. यात जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यात सर्वांचे प्रश्न सोडविण्यात येतील, डीआरडीएच्या धर्तीवर ‘दिशा’ योजनेअंतर्गत हे जनता दरबार घेण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.केंद्र शासनाच्या आर्थिक बजेट बाबतीत बोलताना ते म्हणाले, हा ऐतिहासिक बजेट आहे. यात रेल्वेचा अर्थसंकल्पाचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला. पूर्वी देशातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी १ लाख कोटी रुपये मंजूर करण्यात येत होते. आता त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून ते १० लाख कोटी रुपये करण्यात आले आहे. यावरून बजेटचा केंद्रबिंदू हा शेतकरी असल्याचेच दिसून येते. शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात पतपुरवठा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनाही किमान वेतन मिळायला पाहिजे, ही मागणी आहे. शेतीवर आधारीत उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे. छोटे उद्योगकांनीही बजेटमध्ये दिलासा मिळाला आहे. रेल्वेच्या विकासासाठी नागपूर विभागाला पहिल्यांदाच १५०० कोटी रुपये मिळाले. यात नागपूर विभागातील रेल्वेचा कायापालट करण्यात येणार आहे.केंद्रीय मंत्रीमंडळाची परवानगी नसताना सुरु करण्यात आलेल्या भेल प्रकल्पाबाबतीत बोलताना खा.नाना पटोले पुढे म्हणाले, पूर्वी भेल प्रकल्प हा २५० मेगावॅटचा राहणार होता. आता तो १ हजार मेगावॅटचा करण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून तसे भेलचे व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठविण्यात आले असल्याची माहितीही खा.पटोले यांनी दिली.गोसेखुर्द प्रकल्पाचे टेंडर निघाले असून केंद्र सरकारच्या कंपनीच्या वतीने सर्व कार्य करण्यात येणार आहे. २०१९ पर्यंत गोसेचे ८० टक्के काम पूर्ण होणार आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत नागनदीचे पाणी वैनगंगा नदीत पडणे थांबणार आहे. यानंतर वैनगंगेच्या काठावरील लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल. (जिल्हा प्रतिनिधी)