शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन

By admin | Updated: July 12, 2017 00:28 IST

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत भंडारा येथे उभारण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारला ई-भूमिपूजन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत भंडारा येथे उभारण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारला ई-भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यातून ई-भूमिपूजन केले. यावेळी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रधान सचिव राजेशकुमार उपस्थित होते.भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात या ई-भूमिपूजन कार्यक्रमाला आ.चरण वाघमारे, आ.रामचंद्र अवसरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, उपसंचालक देशकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक शिवाजी पदमणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे जिभकाटे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप मैदमवार, सहाय्यक भूवैज्ञानिक डॉ.रेखा बोधनकर, कनिष्ठ भूवैज्ञानिक खापरे, पाणी गुणवत्ता तंत्रज्ञ मडामे, कातुरे, पंचभाई, लांडे व मोरके उपस्थित होते. भंडारा येथे ३२.७० लाख रूपये खर्च करुन जलस्वराज-२ कार्यक्रमांतर्गत पाणी गुणवत्ता प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील १७१ प्रकल्पाचे ई-भूमिपूजन केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पाणी पुरवठयाचे मॉडेल तयार करण्यात आले आहे. ग्रामीण भागात पिण्याचे शुध्द पाणी देण्यासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशिल राहणार आहे. सोमवारी ई-भूमिपूजन करण्यात आलेल्या सर्व योजना निश्चित कालावधीत करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.चरण वाघमारे, आ. रामचंद्र अवसरे यांच्याशी संवाद साधला. ई-भूमिपूजन हा कार्यक्रम अतिशय अविस्मरणीय व शासनाचा निधी वाचवणारा असल्याचे सांगून आ.चरण वाघमारे यांनी मुख्यमंत्री, पाणी पुरवठा मंत्री व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.