शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

झाडीबोली ही परिवर्तनवादी चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:31 IST

भाषा ही शुद्ध किंवा अशुद्ध नसते तर तिला भाषाशास्त्राचे नियम लावून आपण तिला अधिक क्लिष्ट करीत असतो. झाडीबोली ही परिवर्तनवादी चळवळ आहे.

ठळक मुद्देश्रीपाद भालचंद्र जोशी यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : भाषा ही शुद्ध किंवा अशुद्ध नसते तर तिला भाषाशास्त्राचे नियम लावून आपण तिला अधिक क्लिष्ट करीत असतो. झाडीबोली ही परिवर्तनवादी चळवळ आहे. बोली ही मुळात पवित्र असून तिची सेवा करणाऱ्या झाडीबोली चळवळीने एक दबावगट निर्माण केला आहे, असे प्रतिपादन अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी उद्घाटनपर भाषणात केले.तुलसी बहुउद्देशिय शिक्षण संस्था, महात्मा गांधी अभ्यास केंद्र व झाडीबोली साहित्य मंडळ साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. घनश्याम डोंगरे, साहित्य नगरी पेट्रोलपंप जवाहरनगर येथील कला व वाणिज्य महाविद्यालय येथे आयोजित संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. संमेलनाध्यक्षपदी बंडोपंत बोढेकर हे होते. यावेळी डॉ. हरिश्चंद्र बोरकर संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेश टेंभरे, राम महाजन, हिरामन लांजे, डॉ. तिर्थराज कापगते, डॉ. अनिल नितनवरे, उदय किरोला, मोतीभाई नायक, शिवशंकर बावनकुळे, डॉ. राजन जयस्वाल, डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे, शिवशंकर घुगूल, मिलिंद रंगारी, प्राचार्य अजयकुमार मोहबंशी सर्व माजी समेलनाध्यक्ष उपस्थित होते.यावेळी श्रीपाद जोशी यांनी, भाषेच्या बाबतीत विदर्भातील माणसं लहान वाटतात आणि पलिकडील माणसं मोठी वाटतात हे आपलं सत्व झुगारून दिल पाहिजे. जे भाषेच्या संबंधात अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे पहिले अध्यक्ष अनिल यांनी झुगारले आणि अनुस्वार तिकडेच फेकले. ११ व्या शतकापासून १७ व्या शतकापर्यंत विदर्भ हा भाषा कला सांस्कृत नाटक, आश्वाद, खगोल ज्योतीशास्त्र, गणित, कृषीमध्ये नायक होता, हे विषरता कामा नये. वेदकाळापासून या महाराष्ट्राच्या कुठल्या भूमिचा जर विचार केला असेल तर तो विदर्भभूमीचा उल्लेख होते आणि ते अत्यंत बहुधार्मिक, बहुसांस्कृतीक, बहुभाषीक अशा संस्कृतीचा होतो.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा भाग व्याप यात तीन संस्था सम्मेलीत होत काळाची गरज आहे. यात कोकण महाराष्ट्र साहित्य परिषद दुसरे म्हणजे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा व आपले झाडीबोली साहित्य मंडळ यामुळे साहित्याला नव उजाळा मिळेल नवचैतन्य लाभेल, असे प्रतिपादन केले. तत्पुर्वी सकाळी पुस्तक दिंडी काढण्यात आली. ताळमृदुंगाच्या गजरात दिंडीला सुरूवात करण्यात आली. दंडार, खडी गंमत, भारूळ सादर करण्यात आले. तदनंतर पाहुण्याचे मार्गदर्शन झाले. साहित्य संमेलनाचे संचालन प्रा. नरेश आंबीलकर यांनी केले. यावेळी उपस्थितांची संख्या मोठी होती.