शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

घरी आईचे पार्थिव तरीही मुलाने बजावले कर्तव्य

By admin | Updated: January 26, 2017 00:51 IST

घरी एखादी सुखद किंवा दु:खद घटना घडली तर आपण सर्व कामे बाजुला सारून त्या-त्या कार्यात गुंतून असतो.

भंडारा : घरी एखादी सुखद किंवा दु:खद घटना घडली तर आपण सर्व कामे बाजुला सारून त्या-त्या कार्यात गुंतून असतो. परंतु वाचकांना सकाळीच वृत्तपत्र मिळाले नाही तर ते अस्वस्थ होतील, या भावनेतून आईचे पार्थिव घरी असतानाही अरविंद शेंडे या वृत्तपत्र विक्रेत्याने घरोघरी जावून दैनंदिन वृत्तपत्र वितरणाच्या कार्यात खंड पडू दिला नाही. आजच्या काळात वृत्तपत्र वाचन अनेकांचा अविभाज्य अंग बनला आहे. त्यामुळे वेळेत वृत्तपत्र मिळाले नाही तर अस्वस्थ होणारे अनेक आहेत. अनेकांकडे दररोज वृत्तपत्र येत असला तरी घरी वृत्तपत्र कोण टाकतात, याची माहितीही नसते. परंतु वृत्तपत्र वितरक कधी सुटी नसतानाही ही कामगिरी निरंतर बजावत असतो. दररोज पहाटे ४ वाजता उठून बसस्थानकावर जावून आपले वृत्तपत्र त्यांना घ्यावे लागतात. त्यानंतर त्या-त्या भागात जाणाऱ्या मुलांना वितरणासाठी द्यावे लागतात. वाचकांना वेळेत वृत्तपत्र पोहचविण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. मात्र त्यांच्या घरी काही दु:खद घटना घडली तरी अशा घटनांना त्यांना सामोरे जावे लागत असते. वृत्तपत्र वितरक अरविंद शेंडे यांची आई चंद्रभागा रूपचंद शेंडे (७०) यांचे वृद्धापकाळाने रात्री निधन झाले. पार्थिव घरी असल्यामुळे कुटुंबांनी रात्र जागून काढली. अंत्यसंस्कार दुपारला होणार होते. परंतु ग्राहकांना वृत्तपत्र वेळेत मिळाले नाही तर ते अस्वस्थ होतील, या एकमेव तळमळीने ते पहाटे ४.३० वाजताच घरून बसस्थानकावर निघाले. बसस्थानकात वृत्तपत्रांचे गठ्ठे वेगवेगळे करून वृत्तपत्र वाटप करणाऱ्या मुलांना वृत्तपत्र मोजून देत होते. त्यानंतर एका लाईनवर जावूनही त्यांनी घरोघरी वृत्तपत्र पोहोचविले. घरी आईचे पार्थिव असतानाही अरविंद शेंडे वृत्तपत्र वितरणासाठी येऊन कामात व्यस्त असल्याचे दिसताच अन्य वृत्तपत्र वितरकांच्या मनात सहानुभूती निर्माण झाली. याची माहिती वाचक आणि ग्राहकांना झाल्यानंतर अरविंद यांच्या कर्तव्यपरायणतेची सर्वत्र प्रशंसा सुरू झाली. यापूर्वी त्यांच्या लहान बंधूचे वृत्तपत्र वितरीत करताना अपघाती निधन झाले होते, त्यावेळीही त्यांनी कर्तव्य बजावले होते, हे विशेष! (जिल्हा प्रतिनिधी)