शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात गाेसे प्रकल्पात हाेणार २४५.५० मीटर जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST

पवनी तालुक्यातील गाेसे खुर्द येथे राष्ट्रीय प्रकल्प असून या प्रकल्पाचे जवळपास पूर्ण काम झाले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाच्या नियाेजित जलसाठ्यात पुनर्वसनाअभावी वाढ करता येत नव्हती. परंतु आता कागदाेपत्री पुनर्वसन पूर्ण झाल्याने १ नाेव्हेंबरपासून या प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. टप्प्याने पाणी वाढवत १५ डिसेंबरपर्यंत २४५.५० मीटरपर्यंत जलसाठा करण्याचे निर्धारित हाेते. मात्र, १६ डिसेंबरपर्यंत या प्रकल्पात २४५.१३० मीटर जलसाठा झाला हाेता.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गाेसे प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दीड महिन्यात २४५.१३० मीटर जलसाठा झाला असून आठवडाभरात पूर्ण क्षमतेने २४५.५० मीटर जलसाठा करण्याचे नियाेजन आहे. प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ हाेत असल्याने बॅक वाॅटरची समस्या निर्माण झाली असून अनेक शेतशिवारात पाणी शिरले असून रस्तेही पाण्याखाली आले आहेत. भूसंपादनाव्यतिरिक्त कुठपर्यंत पाणी जाणार याची खात्री प्रशासन या माध्यमातून करीत आहे.पवनी तालुक्यातील गाेसे खुर्द येथे राष्ट्रीय प्रकल्प असून या प्रकल्पाचे जवळपास पूर्ण काम झाले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाच्या नियाेजित जलसाठ्यात पुनर्वसनाअभावी वाढ करता येत नव्हती. परंतु आता कागदाेपत्री पुनर्वसन पूर्ण झाल्याने १ नाेव्हेंबरपासून या प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. टप्प्याने पाणी वाढवत १५ डिसेंबरपर्यंत २४५.५० मीटरपर्यंत जलसाठा करण्याचे निर्धारित हाेते. मात्र, १६ डिसेंबरपर्यंत या प्रकल्पात २४५.१३० मीटर जलसाठा झाला हाेता. आता साधारणत: २२ डिसेंबरपर्यंत या प्रकल्पाचा जलसाठा २४५.५० मीटर हाेण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ करण्याचा निर्णय घेताच बॅक वाॅटरमध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झाली. भंडारा शहरासह तालुक्यातील अनेक गावातील शेतशिवारात पाणी शिरले. रस्ते पाण्याखाली आले. भंडारा शहरातील ग्रामसेवक काॅलनीपर्यंत बॅक वाॅटर आले आहे. वैनगंगेच्या जलसाठ्यातही माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अथांग पाणी पात्रात दिसत असून वैनगंगेचा कारधा येथील लहान पूल पाण्याखाली येण्याची शक्यता आहे. गुरुवारी कारधा येथे वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी २४५.०७ मीटर नाेंदविण्यात आली. कारधा येथील जुन्या पुलावरुन वाहतूकही बंद करण्यात आली. २४५.५० मीटर जलसाठा झाल्यास विविध समस्याही निर्माण हाेण्याची शक्यता आहे.

बॅक वाॅटरचे सर्वेक्षण करणार गाेसे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ केल्यानंतर २४५.५० मीटर जलसाठा झाल्यावर बॅक वाॅटर कुठपर्यंत जाते, याचे सर्वेक्षण गाेसे पुर्नवसन विभागाच्यावतीने करण्यात येणार आहे. भूसंपादन झालेल्या व्यतिरिक्त कुठपर्यंत पाणी जाणार याचीही खात्री या निमित्ताने केली जाणार आहे. या बॅकवाॅटरच्या काेणत्या भागाला धाेका आहे याची माहिती घेतली जाईल. याबाबतचा अहवाल जलसंपदा विभागाला साेपविला जाणार आहे.

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प