शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

संपकाळात एसटी बसेसमधून दररोज 14 हजार प्रवाशांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:00 IST

राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गत तीन महिन्यांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे एसटीची चाके ठप्प होती. शासनस्तरावर विविध बोलण्या होऊनही अनेक कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. अशा स्थितीत भंडारा विभागाने प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता, बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. गत तीन आठवड्यांपासून बसेस धावत आहेत. या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विस्कटलेली एसटीची घडी बसविण्याचा प्रयत्न सुरू असून, कंत्राटी व नियमित कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सध्या भंडारा आगारातून ७१ एसटी बसेस धावत आहेत. दररोज १४ हजार प्रवासी प्रवास करीत असून, नागपूर मार्गावरील बसेस खचाखच भरून जात आहेत.राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गत तीन महिन्यांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे एसटीची चाके ठप्प होती. शासनस्तरावर विविध बोलण्या होऊनही अनेक कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. अशा स्थितीत भंडारा विभागाने प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता, बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. गत तीन आठवड्यांपासून बसेस धावत आहेत. या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भंडारा विभागातील सहा आगारांत ३६७ बसेस असून, त्यापैकी ७१ बसेस रस्त्यावर धावत आहेत. नागपूर, गोंदिया, साकोली, तिरोडा, तुमसर या मार्गावर दररोज बसफेऱ्या सुरू आहेत. सरासरी १४ हजार प्रवासी बसेसमधून प्रवास करीत आहेत. भंडारा विभागातील ४१० विविध कर्मचारी कामावर रुजू झाले असून, अद्यापही ११०० कर्मचारी संपावर कायम आहेत. त्यांना अल्टिमेटम देण्यात आला आहे.

६१० कर्मचाऱ्यांवर  कारवाई- भंडारा विभागातील संपात सहभागी झालेल्या ६१० कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. त्यात १६३ नियमित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. २७७ कर्मचाऱ्यांचे निलंबन, तर ८६ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती आणि ८४ कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात आले आहे.

५० कंत्राटी चालक सेवेत- राज्य परिवहन महामंडळाने कंत्राटी चालकांच्या भरवशावर बससेवा सुरू केली आहे. भंडारा आगारात ५० कंत्राटी चालक सेवा देत आहेत, तर पाच वाहन तपासणी अधिकारीही सध्या चालकाची भूमिका बजावत आहेत. यांत्रिक कर्मचाऱ्यांना चालक म्हणून नियुक्ती देण्यासाठी वरिष्ठांसोबत पत्रव्यवहार करण्यात येत आहे.

भंडारा विभागातून बससेवा सुरळीत करण्याचा निरंतर प्रयत्न सुरू आहे. आणखी कंत्राटी चालक पुरविण्यासाठी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे.-डाॅ. चंद्रकांत वडस्कर,  विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप