शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

पावसाळ्यातही सूर्य ओकतोय आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:43 IST

मृग लागल्यानंतर सुरूवातीचे दोन-तीन दिवस चांगली हजेरी लावल्यानंतर आता मात्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले असून अंगाची लाही-लाही होत आहे. उन्हाळा परतून आल्यासारखे वातावरण तापू लागले असून कधी पाऊस बरसतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ठळक मुद्देपावसाने मारली दडी : उकाड्याने नागरिक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मृग लागल्यानंतर सुरूवातीचे दोन-तीन दिवस चांगली हजेरी लावल्यानंतर आता मात्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले असून अंगाची लाही-लाही होत आहे. उन्हाळा परतून आल्यासारखे वातावरण तापू लागले असून कधी पाऊस बरसतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.७ जून पासून पावसाळा सुरू होतो. हवामान खात्यानेही यंदा पावसाळा सुरूवातीपासूनच खुश करणार, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र त्यांचा अंदाज चूक ठरत असल्याचेही दिसून येत आहे. सुरूवातीचे दोन-तीन दिवस पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता व सर्वांना उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. वातावरण थंड झाल्याने सर्वच खुश होते. मात्र आता आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याचे दिसून येत आहे. परिणामी वातावरण पुन्हा तापू लागले आहे.विशेष म्हणजे उन्हापासून पाण्याची वाफ होत असून या उमसमुळे जीव कासावीस होऊ लागला आहे. उन्ह पुन्हा उन्हाळ््यासारखे तापू लागले असून घराबाहेर पडण्यासाठी विचार करावा लागत आहे. त्यामुळे आता पाऊस लवकर बरसावा, यासाठी सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.जून महिन्याचा आता शेवट असून फक्त दोन-तीन दिवसच पाऊस पडल्याने हा महिनाही असाच तर निघत नाही ना असा प्रश्न ही पडत आहे.पारा ३८ डिग्रीच्या घरातपावसाळा सुरू झाला असूनही जिल्ह्याचा पारा आजही ३८ डिग्रीच्या घरात आहे. यावरून उकाड्याचा अंदाज लावता येतो. आता पाऊस पडल्यावरच यावर काही तोडगा निघणार व पारा खाली उतरल्यावरच उकाड्यापासून सुटका मिळणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून पाऊस बरसण्याची वाट बघत आहेत.११५.५ मिमी बरसला पाऊसजिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात २५ जून पर्यंत ११५.५ मिमी पाऊस बरसल्याची नोंद घेण्यात आली आहे. यात सर्वाधिक पाऊस भंडारा तालुक्यात १५२.० मिमी बरसला असून सर्वात कमी पाऊस तुमसर तालुक्यात ५९.५ मिमी बरसल्याची माहिती आहे. याशिवाय मोहाडी तालुक्यात १०९.९ मिमी, पवनी तालुक्यात १०३ मिमी, साकोली तालुक्यात १२९.८ मिमी, लाखांदूर तालुक्यात १४३.४ मिमी, लाखनी तालुक्यात ११०.८ मिमी असा एकूण ८०८.७ पाऊस बरसला असून त्याची सरासरी ११५.५ एवढी आहे.हवामान खात्याचा अंदाज चुकलाहवामान खात्याकडून आतापर्यंत पावसाला घेऊन वर्तविण्यात आलेला अंदाज चुकलेला दिसत आहे. सुरूवातीपासूनच दमदार पाऊस राहणार असे सांगीतले जात असताना वास्तविक पावसाने निराशा केली आहे. आताही २३ ते २६ तारखेदरम्यान वादळीवारा व दमदार पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र २५ तारीख निघून गेली तरिही पावसाने हजेरी लावलेली नाही. अशात हवामान खात्याचा अंदाज चुकत असल्याचे दिसत आहे.