शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धान कापणीच्या हंगामात ‘पोलीस ठाणे आपल्या गावात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 21:44 IST

धान कापणीच्या हंगामामुळे गावागावातील शेतकरी आणि शेतमजूर व्यस्त आहेत. अशा काळात जिल्हा पोलीस दलाचे फिरते ठाणे गावागावात जाऊन तक्रारी नोंदवून घेत विविध प्रकरणांचा निपटाराही करीत आहेत. एवढेच नाही तर नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या वेळेची व पैशाची बचत होऊन गावात शांततेचे वातावरण निर्माण होत आहे.

ठळक मुद्देफिरत्या पोलीस ठाण्याला प्रतिसाद : नागरिकांचा वेळ व पैशाची बचत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धान कापणीच्या हंगामामुळे गावागावातील शेतकरी आणि शेतमजूर व्यस्त आहेत. अशा काळात जिल्हा पोलीस दलाचे फिरते ठाणे गावागावात जाऊन तक्रारी नोंदवून घेत विविध प्रकरणांचा निपटाराही करीत आहेत. एवढेच नाही तर नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या वेळेची व पैशाची बचत होऊन गावात शांततेचे वातावरण निर्माण होत आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या संकल्पनेतून दोन वर्षापासून भंडारा जिल्ह्यात फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाला ग्रामीण जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सध्या शेती हंगामात शेतकरी व शेतमजूर व्यस्त आहेत.अशा काळातपोलिसांनी त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांच्या तक्रारी निपटारा करण्याचे काम सुरु केले आहे. आंधळगाव क्षेत्रांतर्गत पांढराबोडी येथे फिरत्या पोलीस ठाण्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या.त्या दोन्ही तक्रारींचा निपटारा करण्यात आला. बँकींग फसवणूक, एटीएम, फ्रॉड, ग्रामसुरक्षा, चोरी आदीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. पवनी तालुक्यातील निष्टी येथे पोलीस निरीक्षक चकाटे यांनी जनतेला वाहतुकीचे मार्गदर्शन केले. याठिकाणी एक प्रकरण दाखल झाले. पालांदूर पोलीस ठाणे अंतर्गत जेवनाळा येथे महिला अत्याचाराविषयक मार्गदर्शन करण्यात आले.लाखांदूर ठाण्यांतर्गत मेंढा येथे पोलीस निरीक्षक मेश्राम यांनी मोबाईलद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांची माहिती दिली. करडी ठाण्यांतर्गत कान्हळगाव येथे ठाणेदार पेंड यांनी आॅनलाईन फ्रॉडबाबत आणि अटक वॉरंटबाबत मार्गदर्शन केले. लाखनी ठाण्यांतर्गत खेडेपार येथेही फिरत्या ठाण्याचे आयोजन करण्यात आले होते.पोलीस व जनतेत विश्वासाचे नातेफिरते पोलीस ठाणे केवळ गुन्हेच नोंंदवून घेत नाही तर विविध विषयांवर मार्गदर्शनही केले जाते. त्यात बँकींग फसवणूक, घरफोडी, चोरी, अंधश्रद्धा निर्मूलन, तक्रार कशी दाखल करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. दारुबंदीबाबतही मार्गदर्शन करून व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले जाते. कामाचा हंगाम असतानाही नागरिक या फिरत्या पोलीस ठाण्याच्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. यातून पोलीस व जनतेत विश्वासाचे नाते निर्माण होत आहे.नागरिकांनी फिरत्या पोलीस ठाणे उपक्रमात सहभागी होऊन आपल्या समस्या, तक्रारी सोडवून घ्याव्यात. विनाकारण प्रकरण न्यायालयापर्यंत नेऊ नये. आपल्या वेळेची व पैशाची बचत करून गावात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे.-विनिता साहू, जिल्हा पोलीस अधिक्षक,भंडारा.