शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

दुर्गाबाई डोह यात्रा आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 21:52 IST

साकोली तालक्यातील कुंभली येथील विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व कुंभलीच्या पूर्वेला निसर्गरम्य वातावरणात असलेल्या दुर्गाबाई डोह कुंभली येथे सोमवारपासून यात्रेला प्रारंभ होत आहे. प्रशासनाची पूर्वतयारी झालेली आहे.

ठळक मुद्देदर्शनासाठी भाविक उत्सुक : पोलिसांचा चोख बंदोबस्त, लाखोंची उलाढाल

देवानंद बडवाईक ।लोकमत न्यूज नेटवर्ककुंभली : साकोली तालक्यातील कुंभली येथील विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व कुंभलीच्या पूर्वेला निसर्गरम्य वातावरणात असलेल्या दुर्गाबाई डोह कुंभली येथे सोमवारपासून यात्रेला प्रारंभ होत आहे. प्रशासनाची पूर्वतयारी झालेली आहे. या यात्रेत अनेक श्रध्दावान भाविक दुर्गाबाई देवीचे व त्यांच्या सात भावांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या भक्तीभावाने येतात, विदर्भात प्रसिध्द असलेला या यात्रेत जिल्ह्यासह नागपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यातील भाविक येत असतात. श्रध्देने डोहात स्नान करतात. पहाटे पासूनच पवित्र स्नानाला सुरुवात होते. गावात पाहुण्यांची रेलचेल असते.या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज आहे.तसेच भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून पिण्याच्या पाण्याची, आरोग्य सेवा, भाविकांना राहण्याची सोय इत्यादी सेवा प्रशासनातर्फे भाविकांसाठी केल्या आहेत. मकरसंक्रातीच्या शुभ पर्वावर भरणारी यात्रा चार ते पाच दिवस चालते. या यात्रेत पारंपारिक हस्तकलेने तयार केलेल्या गृहोपयोगी साहित्याची दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते.पूर्वीपासून घोड्यांच्या विक्रीसाठी ही यात्रा प्रसिध्द आहे. परंतु कालांतराने घोडाबाजार मंदावला. दोन ते चार घोड्यांचे दर्शन मात्र होत होते. या यात्रेत अनेक प्रकारची दुकाने थाटली असून लाखो रुपयाची उलाढाल होते. हॉटेल्स, कपड्याची दुकाने, स्वेटर, जॅकेट, चपलांची दुकाने, सौंदर्य प्रसाधने, खेळणे, झुले, लोखंडी अवजारे, दगडी पाट्यांची दुकाने, प्रदर्शनी तसेच मुलांना विशेष आकर्षण असलेले ब्रेक डान्स झुला, मौत का कुवा या सार्व प्रकारामुळे यात्रा फुसून जाते. यात्रेकरिता प्रवाशांची जाण्यायेण्याची पध्दतशीर सोय व्हावी म्हणून एस. टी. महामंडळातर्फे ज्यादा बसेसची व्यवस्था केलेली असते.या डोहावर निम्न चुलबंद प्रकल्प तयार झाला असून प्रकल्पाची सर्व दारे बंद करुन पाणी अडविले असल्यामुळे डोहातील पाण्याची पातळी खोलवर गेली असून भरपूर पाणी साचले आहे. त्यामुळे डोहाच्या चारही बाजूला बॅरिकेट्स तयार केले असून डोहाच्या बाजूने आंघोळीकरिता बंदी घालण्यात आली आहे.यात्रेत निसर्गाचा सुंदर नजराणा पहावयास मिळत असतो. यात्रेचे भव्य स्वरुप बघता पोलीस प्रशासन बारिक नजर ठेऊन आहे. जिकडे तिकडे पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. भाविकांनी शिस्तीने रांगेत दर्शन घेता यावे याकरिता पुरुषांकरिता व महिलांकरिता वेगवेगळी व्यवस्था केली आहे.यात्रेत खरेदी-विक्रीचे प्रमाण जास्त प्रमाणात होत असून प्लॉस्टिकचा वापर जास्त प्रमाणात होतो. यात्रेत प्लास्टिकचा वापर होऊ नये व यात्रा प्लास्टिकमुक्त व पर्यावरण पुरक याकरिता बॅनरद्वारे व स्वयंसेवकाद्वारे प्रयत्न करण्यात येणार आहे. अशाप्रकारे दुर्गाबाईचे मंदिर हे जागृत देवस्थान असून भाविक मोठ्या भक्तीभावाने येऊन मकरसंक्रातीच्या पर्वावर भरणाऱ्या यात्रेत दुर्गादेवीचे दर्शन घेऊन आर्शिवाद घेतात. चार ते पाच दिवस चालणाºया यात्रेनिमित्त गावात भजन, पूजन, नाटक, कव्वाली असे अनेक मनोरंजनात्मक व जनजागृतीचे कार्यक्रम होत असतात. सदर यात्रा भरण्याचा पूर्वइतिहास असून दुर्गाबाई व त्यांच्या सात भावांनी बांधलेल्या परंतु अर्धवट राहिलेल्या खिंडीचे दर्शन सुध्दा होते. सामाजिक ऐक्य, समरसता व निसर्गाची मुक्त उधळण या यात्रेत पहावयास मिळत असते, हे येथे उल्लेखनीय.