शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गाबाई डोह यात्रेला आजपासून सुरुवात

By admin | Updated: January 13, 2015 22:54 IST

संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेली कुंभली येथील दुर्गाबाई डोह यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. ही यात्रा दरवर्षी मकरसंक्रांतीला भरत असून तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत दरवर्षी

संजय साठवणे - साकोलीसंपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेली कुंभली येथील दुर्गाबाई डोह यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. ही यात्रा दरवर्षी मकरसंक्रांतीला भरत असून तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत दरवर्षी लाखो भाविक दर्शनाकरिता येतात. या यात्रेला प्रशासन व मंदिर कमेटी सज्ज असून आज सकाळी येथील डोहात भाविक आंघोळ करून विधिवत पूजापाठ करणार आहेत. दरवर्षी मकरसंक्रांतीला म्हणजे दि. १४ जानेवारीला भरत असलेली ही यात्रा तीन दिवस भरते. मकरसंक्रांतीचा दिवस प्रयाग स्नानारंभ असल्याने भाविक मोठ्या आस्थेने आंघोळ करून पूजाअर्चा करतात. या यात्रेदरम्यान कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागातर्फे चोख बंदोबस्त ठेवल्या जातो. तर संबंधित विभागाकडून पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य शिबिर, मोफत औषध वाटप यासारख्या विविध सोयीसुविधा शासनातर्फे भाविकांना पुरविल्या जातात.मंदिराचा जीर्णोद्धारदुर्गाबाईचा मंदिर हे फार वर्षापूर्वीचे बांधलेले होते. कालांतराने हे मंदिर जीर्ण झाले. चार वर्षापूर्वी खा.नाना पटोले यांनी पर्यटन विकास निधीतून या मंदिराचे जीर्णोद्धार केले. मात्र नवीन मंदिर तयार करताना मूर्ती जुन्याच जागी ठेवण्यात आल्या. त्यांना हलविण्यात आले नाही हे विशेष.जादा बसेसची सोयदुर्गाबाई डोह यात्रा संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असल्याने या यात्रेला भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यातून भाविक येतात. त्यामुळे साकोली आगारातून यात्रेसाठी जादा बसेसची सोय दरवर्षी करण्यात येते.घोडाबाजार आकर्षणपुरातन काळापासून सुरु असलेल्या या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे यात्रेत घोड्यांचा बाजार भरतो. या बाजारात घोड्यांची खरेदी विक्री केली जाते. हे यात्रेचे आणखी एक आकर्षण आहे. बॅनर युद्धयात्रेत लाखो भाविक येत असल्यामुळे या यात्रेत विविध पक्षाच्या नेत्यांचे भाविकांना शुभेच्छा देणारे शेकडो बॅनर लावले असतात. पाहुण्यांची रेलचेलधर्मापुरी व कुंभली या दोन्ही गावात यात्रेदरम्यान घरोघरी पाहुण्यांची गर्दी असते. तर गावकरी मनोरंजनासाठी दरवर्षी नाटकाचे आयोजन करतात.गृहोपयोगी वस्तूंची विक्रीपारंपारिक व हस्तकलेने तयार केलेल्या वस्तूंची विक्री या यात्रेतून मोठ्या प्रमाणात होते. यात्रेदरम्यान दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यात्रेची आख्यायिकाकाही वर्षापूर्वी कुंभली धर्मापुरी गावाला लागूनच असलेल्या गावाबाहेर टेकडीवर गवळी जमात वास्तव्य करीत होती. शेती व गुरे पाळणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. शेतीला मुबलक पाणी पुरवठा व्हावा, या हेतूने लागूनच असलेल्या चुलबंद नदीवर बांध घालण्यासाठी या जमातीमधील प्रमुख कुटुंबे समोर आली. त्या कुटुंबातील सात भाऊ व एक बहिण असे आठ जण हा डोह बघताना गतप्राण झाले अशी आख्यायिका आहे.